इंधन बचतीसाठी राज्याला केंद्राचा पुरस्कार
By Admin | Updated: January 16, 2016 01:19 IST2016-01-16T01:19:17+5:302016-01-16T01:19:17+5:30
इंधन बचतीसाठी विविध उपक्रम प्रभावीपणे राबविल्याबद्दल महाराष्ट्राला केंद्र शासनाचा प्रथम पुरस्कार जाहीर झाला आहे. पेट्रोलियम राज्यमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते १६ जानेवारी

इंधन बचतीसाठी राज्याला केंद्राचा पुरस्कार
मुंबई : इंधन बचतीसाठी विविध उपक्रम प्रभावीपणे राबविल्याबद्दल महाराष्ट्राला केंद्र शासनाचा प्रथम पुरस्कार जाहीर झाला आहे. पेट्रोलियम राज्यमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते १६ जानेवारी रोजी राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाचे प्रधान सचिव दीपक कपूर आणि इंधन उद्योगाचे तत्कालीन राज्य समन्वयक ए.एल. कृष्णन उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज याबाबत टिष्ट्वट करून संबंधितांचे अभिनंदन केले. (प्रतिनिधी)