राज्याच्या कृषी विभागाला केंद्राचा पुरस्कार
By Admin | Updated: December 28, 2014 01:16 IST2014-12-28T01:16:43+5:302014-12-28T01:16:43+5:30
डाळींच्या उत्पादन वाढीसाठी राबविलेल्या मोहिमेसाठी राज्य सरकारला केंद्रीय कृषी मंत्रालयाचा १ कोटी रुपयांचा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यामुळे राज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

राज्याच्या कृषी विभागाला केंद्राचा पुरस्कार
पुणे : डाळींच्या उत्पादन वाढीसाठी राबविलेल्या मोहिमेसाठी राज्य सरकारला केंद्रीय कृषी मंत्रालयाचा १ कोटी रुपयांचा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यामुळे राज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
देशाला तेलबिया व डाळींची मोठ्या प्रमाणावर आयात करावी लागते. या मुळे डाळी-तेलबियांच्या खरेदीसाठी परकीय चलनाचा मोठा भाग देशाला खर्च करावा लागतो. राज्याने डाळींची उत्पादकता वाढावी या साठी विशेष मोहीम हाती घेतली होती. त्यामुळे उत्पादकतेत वाढ झाली आहे. या प्रयत्नाचा गौरव केंद्रीय कृषी विभागाकडून करण्यात आला आहे.
या विषयी कृषी आयुक्त उमाकांत दांगट म्हणाले, तूर, सोयाबीन व हरभरा या पिकांमध्ये राज्याने आघाडी घेतली आहे. खरीपात तूर व सोयाबीनचे आंतरपिक घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात आले होते. तसेच खरीप हंगामात ज्या क्षेत्रावर सोयाबीन पेरले आहे, तेथे रब्बी हंगामात हरभरा घेण्यात यावा यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त केले. या शिवाय रुंद वरंबा व सरी यंत्राचा वापर करुन पिकाच्या मूळस्थानी जलसंधारण करण्यावर भर देण्यात आला. या मुळे उत्पादकतेत वीस ते ३० टक्के वाढ झाली आहे. (प्रतिनिधी)
डाळींची उत्पादकता (२०१३-१४)
खरीप रब्बी
क्षेत्र१९.७८ लाख हेक्टर१९.४२ लाख हेक्टर
उत्पादन१४.४३ लाख टन१६.७७ लाख टन
उत्पादकता७३० किलो/प्रतिहेक्टर८६४ किलो/प्रतिहेक्टर