शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राने सल्ल्याऐवजी इंधनावरील  दर कमी करावेत, अजित पवारांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 06:04 IST

Ajit Pawar News: राज्याला पेट्रोल, डिझेलवरील कर कमी करण्याचा सल्ला देण्याऐवजी केंद्र सरकारने इंधनावरील कर कमी करावेत, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी केले.

 मुंबई - राज्य सरकारने गॅसच्या किमती कमी करण्याचा प्रयत्न केला; परंतु, आम्ही किमती कमी केल्या तरी पुन्हा पेट्रोल-डिझेल आणि गॅसच्या किमती वाढतच आहेत. सध्या त्यांचा आकडा कुठल्या कुठे जात आहे. राष्ट्रवादीसह विविध पक्ष यावरून आंदोलनही करीत आहेत. त्यामुळे राज्याला पेट्रोल, डिझेलवरील कर कमी करण्याचा सल्ला देण्याऐवजी केंद्र सरकारने इंधनावरील कर कमी करावेत, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी केले.

अभिनेत्री आसावरी जोशी यांनी गुरुवारी पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्या वेळी पत्रकारांशी बोलताना पवार यांनी राज्यात पेट्रोल, डिझेलवरील कर कमी करण्यास नकार दिला. राज्याने नव्याने कोणतेही कर लावलेले नाहीत. उलट गॅस सिलिंडरसंदर्भात एक हजार कोटींचा कर आम्ही माफ केला. काहीजण सांगत आहेत की, राज्याने पेट्रोल व डिझेलवरील कर कमी करावेत. असे असेल तर केंद्रानेही आपले कर कमी करावेत, अशी टीकाही त्यांनी विरोधकांवर केली. यासोबतच मेट्रो, एसटी संपासह विविध मुद्द्यांवर भाष्य केले.

कांजूरमार्ग मेट्रो कारशेडसंदर्भात संसदेत विषय मांडण्याची सूचना आमच्या खासदारांना केली आहे. तसेच मेट्रो प्रशासनाशीही चर्चा करून सकारात्मक तोडगा काढण्याची आमची तयारी आहे. तर, एस.टी. कामगारांच्या प्रश्नावर सध्या उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. न्यायव्यवस्थेने दिलेला निर्णय हा सर्वांनीच मान्य करायचा असतो, असे पवार म्हणाले.

विकासनिधीत घट केलेली नाहीआमदारांच्या निधी प्रश्नावर बोलताना कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निधीवाटपास मर्यादा होत्या. आहे त्या निधीतून राज्यविकासाला आपल्याला खीळ बसवू द्यायची नव्हती. मात्र आम्ही जे-जे करता येईल ते-ते केले. कुठल्याही विकासनिधीमध्ये घट केली नाही. या वर्षी आपण रस्ते व विकास महामंडळाला विक्रमी असा २१ हजार कोटींचा निधी दिला. आपण राज्यामध्ये कुठलाही नवीन कर लावलेला नाही, असे ते म्हणाले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारPetrolपेट्रोलDieselडिझेलMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार