‘शिवरायांच्या बदनामीची केंद्रस्थाने’
By Admin | Updated: August 7, 2014 00:58 IST2014-08-07T00:58:58+5:302014-08-07T00:58:58+5:30
पुरुषोत्तम खेडेकर यांच्याविरोधात कल्याण न्यायालयात दाखल असलेल्या अब्रुनुकसानी दाव्याची सुनावणी 21 ऑगस्टला होणार असून या दिवशी या दाव्याचा निकाल लागण्याची शक्यता आहे.

‘शिवरायांच्या बदनामीची केंद्रस्थाने’
>कल्याण : ‘शिवरायांच्या बदनामीची केंद्रस्थाने’ या पुस्तकाचे लेखक तथा मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांच्याविरोधात कल्याण न्यायालयात दाखल असलेल्या अब्रुनुकसानी दाव्याची सुनावणी 21 ऑगस्टला होणार असून या दिवशी या दाव्याचा निकाल लागण्याची शक्यता आहे. मंगळवारी जिल्हा तदर्थ न्यायाधीश एम.एच. मोरे यांच्या न्यायालयात या दाव्यावरील अपिलाची सुनावणी झाली.
खेडेकर यांनी लिहिलेल्या ‘शिवरायांच्या बदनामीची केंद्रे’ या पुस्तकात त्यांनी ब्राrाणांची बदनामी केल्याप्रकरणी त्यांच्यासह पुस्तकाचे प्रकाशक किशोर कडू यांच्याविरोधात कल्याणातील अॅड. प्रकाश दाबके यांनी कल्याण न्यायालयातील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालय 5 वे या ठिकाणी अब्रुनुकसानीचा दावा दाखल केल्याने खेडेकरांना हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.
परंतु, खेडेकरांनी मूळ प्रकरणाविरोधात जिल्हा तदर्थ न्यायाधीश मोरे यांच्या न्यायालयात अपील दाखल केले होते. या अपील अर्जावर मंगळवारी सुनावणी झाली.
यात न्यायालयाने निरीक्षण नोंदवताना संबंधित प्रकरण संवेदनशील असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो़ त्यामुळे प्रत्येक तारखेला अर्जदाराला उपस्थित राहण्यासंदर्भात बंधन घालू नये, असे नमूद केल्याची माहिती खेडेकरांचे वकील अॅड. गणोश घोलप यांनी दिली.
सुनावणी दरम्यान मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेडच्या कार्यकत्र्यानी न्यायालयाच्या आवारात मोठय़ा संख्येने गर्दी केली होती. या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. (प्रतिनिधी)