‘लोकमत स्टाईल’ अवॉर्डला सेलीब्रेटी लावणार हजेरी
By Admin | Updated: January 29, 2017 13:18 IST2017-01-29T01:45:23+5:302017-01-29T13:18:08+5:30
स्टाईल आणि स्टायलिश व्यक्तिमत्त्व याला नवे परिमाण मिळवून देणारा एक आगळावेगळा आणि अभिनव सन्मान सोहळा लवकरच रंगणार आहे. महाराष्ट्राचा मानबिंदू

‘लोकमत स्टाईल’ अवॉर्डला सेलीब्रेटी लावणार हजेरी
मुंबई : स्टाईल आणि स्टायलिश व्यक्तिमत्त्व याला नवे परिमाण मिळवून देणारा एक आगळावेगळा आणि अभिनव सन्मान सोहळा लवकरच रंगणार आहे. महाराष्ट्राचा मानबिंदू आणि राज्यातील अव्वल क्रमांकाचे दैनिक ‘लोकमत’ने (CNX) स्टायलिश पैलूंना हेरण्याचे ठरवले आहे. यासाठी कॉटन किंग प्रस्तुत ‘लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश’ अवॉर्डचे आयोजन ‘लोकमत’च्या वतीने करण्यात आले आहे. या पुरस्कार सोहळ्याचे प्रोग्रेस पार्टनर बीव्हीजी इंडिया लिमिटेड आहेत. मराठी, हिंदी चित्रपटसृष्टी, तसेच फॅशन आणि उद्योग जगतातील मान्यवरांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.
या सोहळ्याला सुपरस्टार हृतिक रोशन, सोनम कपूर यांसारख्या अनेक बॉलीवूड सेलीब्रिटींची उपस्थिती लाभणार आहे. तसेच शिवसेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हेदेखील वेळात वेळ काढून या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या होममिनिस्टर म्हणजेच अमृता फडणवीस, मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण करणारी सोनाली कुलकर्णीदेखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहे.
डॅशिंग अभिनेता टायगर श्रॉफ आपल्या अनोख्या स्टाइलमुळे आणि नृत्य कौशल्यामुळे तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनला आहे. टायगरदेखील या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहून पुरस्कार सोहळ्याला चारचाँद लावणार आहे, तसेच मराठी चित्रपटसृष्टीतील अमृता खानविलकर, महेश मांजरेकर, सई ताम्हणकर, स्वप्निल जोशी, आदिनाथ कोठारे, ऊर्मिला कानेटकर-कोठारे यांसारखे अनेक दिग्गज कलाकार या सोहळ्याची शोभा वाढवणार आहेत.
अल्पावधीतच विविध प्रकारच्या भूमिका साकारून अभिनेत्री राधिका आपटेने रसिकांची मने जिंकलीत. राधिकादेखील या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहणार आहे.
याशिवाय या आगळ्यावेगळ्या पुरस्कार सोहळ्याला ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर, गुलशन ग्रोव्हर, डिनो मोर्या, उद्योगपती सज्जन जिंदाल आणि संगीता जिंदाल यांचीही उपस्थिती लाभणार आहे. या सेलीब्रिटींच्या फॅशन स्टाईल, फॅशन स्टेटमेंटकडे आता साऱ्यांची नजर लागली आहे.