जन्मकल्याणक सोहळा उत्साहात

By Admin | Updated: February 15, 2016 04:05 IST2016-02-15T04:05:42+5:302016-02-15T04:05:42+5:30

बागलाण तालुक्यातील प्रसिद्ध जैन तीर्थक्षेत्र मांगीतुंगी येथील भगवान वृषभदेवांच्या पंचकल्याणक महामस्तकाभिषेक महोत्सवाच्या रविवारी चौथ्या दिवशी जन्मकल्याणक सोहळ््यासाठी भाविकांचा जनसागर लोटला होता

In the celebration of the birth centenary celebrations | जन्मकल्याणक सोहळा उत्साहात

जन्मकल्याणक सोहळा उत्साहात

सटाणा : बागलाण तालुक्यातील प्रसिद्ध जैन तीर्थक्षेत्र मांगीतुंगी येथील भगवान वृषभदेवांच्या पंचकल्याणक महामस्तकाभिषेक महोत्सवाच्या रविवारी चौथ्या दिवशी जन्मकल्याणक सोहळ््यासाठी भाविकांचा जनसागर लोटला होता. सकाळी साडेसहापासून भजने, अप्सरांचे नृत्य, सवाद्य रथ मिरवणूक आणि भगवान वृषभदेवांच्या जयघोषामुळे तीर्थस्थळ भक्तिसागरात बुडाले.
महोत्सवासाठी सुमारे एक लाख चौरस फुटांचा सर्वतोभद्र महल तयार करण्यात आला आहे. रविवारी जन्मकल्याणकचा कार्यक्र म ठेवण्यात आला होता. सकाळी साडेसहा वाजता भगवान वृषभदेवांचा भक्तिमय वातावरणात जन्म झाला. आचार्य, मुनी, माताजींनी जयघोष करून आनंदोत्सव साजरा केला. सोहळ््यात मूर्तिनिर्माण समितीचे अध्यक्ष डॉ. पन्नालाल पापडीवाल, कुमकुमदेवी पापडीवाल यांना माता-पित्याचा मान देण्यात आला. त्यानंतर पांडूकशिलेवर जन्माभिषेक करण्यात आला. सायंकाळी इंद्र-इंद्रानी यांची महलच्या चौफेर ढोलताशाच्या गजरात रथ मिरवणूक काढण्यात आली. दरम्यान, ज्ञानमती माता यांनी भगवान वृषभदेवांचे नामकरण करून रात्री पाळणा मंत्रोच्चाराने हलविण्यात आला. (प्रतिनिधी)
जन्मकल्याणक सोहळ््यानंतर भगवान वृषभदेव सोमवारी राजकुमार होतील. त्यासाठी त्यांच्या डोक्यावर आठ फूट उंचीचा आणि सव्वीस फुट रु ंदीचा नगीना, काची दगड, दप्त यांनी सजवलेला मुकुट चढविण्यात येईल. त्यानंतर एक हजार मीटर कापडाचा कुर्ता-पायजमा चढविला जाणार आहे. राजकुमारची पूजाअर्चा केल्यानंतर ते दीक्षा घेतील .माता-पित्याने पोटाला चिमटा घेऊन मुलांना लहानाचे मोठे करून मायेची ऊब दिली. त्यांना वृद्धापकाळात मुलांच्या आधाराची गरज असते. मात्र आजची पिढी पत्नीसाठी जन्मदात्यांना वृद्धाश्रमाची वाट दाखवतात, याच्याइतके दु:ख कोणतेही नाही. हे पाप असून आजच्या पिढीने मातापित्यांचा सन्मान करून त्यांचा प्रेमाने सांभाळ करावा, हेच खरे पुण्यकर्म.
- गानिनीप्रमुख ज्ञानमती माता

Web Title: In the celebration of the birth centenary celebrations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.