अभिनय कट्ट्यावर रंगला उत्सव लावण्यांचा
By Admin | Updated: September 22, 2016 03:34 IST2016-09-22T03:34:20+5:302016-09-22T03:34:20+5:30
नृत्यांगना माधुरी आचरेकर - चव्हाण हिने सादर केलेल्या दिलखेच अदाकारीने भरलेल्या लावण्यांचा उत्सव ठाणेकरांनी अभिनव कट्ट्यावर अनुभवला.

अभिनय कट्ट्यावर रंगला उत्सव लावण्यांचा
ठाणे : ठाण्यातील नृत्यांगना माधुरी आचरेकर - चव्हाण हिने सादर केलेल्या दिलखेच अदाकारीने भरलेल्या लावण्यांचा उत्सव ठाणेकरांनी अभिनव कट्ट्यावर अनुभवला. तिच्या प्रत्येक सादरीकरणाने लहान मुलांपासून ते आबालवृद्धांपर्यंत प्रत्येकाला थिरकायला भाग पाडले. ‘कुठं तुम्ही गेला होता’, ‘लाल पैठणी रंग माझ्या चोळीचा’, ‘भरलं आभाळ’ अशा अनेक लावण्यांचे सादरीकरण यावेळी झाले.
या कट्ट्याचे दुसरे वैशिष्टय म्हणजे उपलब्ध साधन सामुग्रीमध्ये उभे केलेले सुरेख नेपथ्य, प्रकाशयोजना, गणेश गायकवाड याचे निवेदन व कट्ट्याच्या कलाकारांनी सादर केलेली बतावणी हे ठरले. बतावणीच्या माध्यमातून सध्याचे महाराष्ट्रातील विविध प्रश्न मिश्किलपणे मांडण्यात आले आणि या प्रश्नांचा सर्वसामान्यांनी, प्रशासन व नेते मंडळीनी विचार करावा असे प्रबोधनात्मक भाष्य देखील केले. योगेश मंडलिक, स्वनिल काळे, वैभव चव्हाण, प्रतीकेश मोरे, नवनाथ कंचार, वैभव जाधव याच सोबत लावणीसाठी श्रावणी कदम, शिवानी देशमुख, शिल्पा लाडवंते, वीणा छत्रे, अश्विनी जगताप, सई कदम यांनी सुद्धा लावण्या सादर करून तिला साथ दिली.
‘उत्सव लावण्यांचा’ या कार्यक्र माची संकल्पना व दिग्दर्शन किरण नाकती यांचे होती. या कार्यक्र माअंती लावण्यवती माधुरी हिचा व तिच्या ज्या कुटुंबीयांनी आजपर्यंत तिला साथ दिली त्यांचा सत्कार करण्यात आला.
>माधुरीच्या जबरदस्त अदाकारीने नटलेला उत्सव लावण्यांचा या कार्यक्रमातून २९० क्रमांकाच्या अभिनय कट्ट्याची सुरु वात झाली.
अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून येवून तिने आपली अंगीभूत कला गेली २२ वर्ष सादर करून अनेक रसिक मायबापांचे फक्त मनोरंजनच नाही तर खऱ्या अर्थाने लावणीचा अर्थ आपल्या प्रत्येक सादरीकरणातून दाखवून दिला.‘भरलं आभाळ’ या लावणीने तिने सुरु वात केली.
प्रत्येक अदाकारीने प्रेक्षकांची मने जिंकत ‘कुणीतरी बोलवा दाजीबाला’ या माधुरीने स्वत: फेटा नेसून केलेल्या लावणीमुळे रसिक मायबापांची वन्स मोअर ची दाद सुरू झाली.
‘प्रीतीच्या झुल्यात झुलवा’ ते ‘नाद खुळा’ या सर्वच माधुरीच्या दिलखेच लावण्यांचा आनंद लुटला. प्रत्येक लावणीनंतर टाळ््यांचा कडकडाट आणि वन्स मोअरची दाद हे सुरूच होते.