शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

यंदाचा गुढी पाडवा असा साजरा करा..! पंचांगकर्ते मोहन दातेंची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2020 14:02 IST

साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला गुढीपाडवा हा आनंदाचा सण...

ठळक मुद्देघरीच राहून साधेपणाने गुढीपूजन कसे करावे याची दाते यांनी दिली माहिती

पुणे: यंदाच्या वर्षी कोरोनाच्या वैश्विक आपत्तीमुळे गुढीपाडव्याचा सण मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यावर अनेक मर्यादा आल्या आहेत. मात्र त्यासाठी निराश न होता  गुढीपूजनाला साखरेची माळ, कडुनिंबाचा फाटा मिळाला नाहीतर, पारंपरिक पद्धती ऐवजी घरी असलेल्या काठीस रेशमी वस्त्र किंवा नवे वस्त्र बांधून ब्रह्मध्वजाय नमः असे म्हणून पूजन करावे. कदाचित काही घरात काठी नसेल तर देवापुढे रांगोळीने किंवा कागदावर गुढीचे चित्र काढून सुद्धा पूजन करता येईल, असे दाते पंचागचे मोहन दाते यांनी सांगितले.     गुढीपाडवा हा आनंदाचा सण... याच दिवशी हिंदू नववर्षाची सुरुवात होते.  साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या या सणाला नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी आदी गोष्टींचा प्रारंभ होतो. परंतु उद्या (25 मार्च) साजरा होणा-या हा सणावर कोरोनाचा प्रभाव असणार आहे.त्यामुळे घरीच राहून साधेपणाने गुढीपूजन कसे करावे याची माहिती दाते यांनी दिली . सूर्योदयानंतर गुढी उभारावी आणि सूर्यास्तानंतर तिचे पूजन करून ती काढावी. हे पूजन करताना नवीन वर्षाचा संकल्प  हा राष्ट्राच्या आणि विश्वाच्या आरोग्यासाठी मी स्वच्छतेचे, शिस्तीचे पालन करेन असा करावा आणि नवीन वर्ष सुखाचे जावो अशी ब्रह्मध्वजास प्रार्थना करावी.    यंदाच्या नवीन वर्षाचे नाव 'शार्वरी' असे असून, यावर्षी अधिक आश्विन महिना आल्याने हे 13 महिन्यांचे वर्ष आहे. 18 सप्टेंबर ते 16 ऑक्टोबर असा अधिक महिना असणार आहे. त्यामुळे यावर्षी गणपती विसर्जनानंतर 1 महिन्याने नवरात्र सुरु होईल, 14 नोव्हेंबरला एकाच दिवशी नरक चतुर्दशी व लक्ष्मीपूजन असून 16 नोव्हेंबरला एकाच दिवशी दिवाळी पाडवा व भाऊबीज आहे, असे मोहन दाते यांनी सांगितले.......

टॅग्स :Puneपुणेgudhi padwaगुढीपाडवाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस