शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

सीडीआर चोरी प्रकरण : यवतमाळ सायबर सेलच्या पोलीस शिपायाला अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2018 19:42 IST

राज्यभर गाजत असलेल्या एसडीआर व सीडीआर डाटा खासगी गुप्तहेराला  पुरविल्याच्या प्रकरणात यवतमाळ सायबर सेलमध्ये कार्यरत पोलीस शिपायाला ठाणे क्राईम ब्रँचने गुरुवारी अटक केली.

यवतमाळ - राज्यभर गाजत असलेल्या एसडीआर व सीडीआर डाटा खासगी गुप्तहेराला  पुरविल्याच्या प्रकरणात यवतमाळ सायबर सेलमध्ये कार्यरत पोलीस शिपायाला ठाणे क्राईम ब्रँचने गुरुवारी अटक केली. विशेष म्हणजे या प्रकरणात यापूर्वी अटकेत असलेला यवतमाळातील अजिंक्य नागरगोजे याला या शिपायाने डाटा पुरविल्याचे तपासात पुढे आल्याने ही कारवाई करण्यात आली. नितीन खवडे (बक्कल नंबर २३४३) असे अटक करण्यात आलेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे. मागील अडीच वर्षापासून तो सायबर सेलमध्ये कार्यरत होता. खासगी गुप्तहेराला डाटा विक्री करण्याच्या गुन्ह्यात ठाणे पोलिसांनी यवतमाळातील अजिंक्य नागरगोजे याला अटक केली. अजिंक्यने यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षकांचा मेलआयडी व पासवर्ड वापरून हा डाटा मिळविल्याचे सुरूवातीला सांगण्यात येत होते. मात्र या गुन्ह्याचा ठाणे क्राईम ब्रँचकडून तपास सुरू होता. त्यासाठी यवतमाळ सायबर सेलच्या शिपायांना सलग दोन वेळा चौकशी करता  ठाणे येथे पाचारण करण्यात आले. पोलीसांच्या चौकशीत अजिंक्य नागरगोजे याने खासगी गुप्तहेर रजनी पंडीत हिला विकलेला डाटा हा सायबर सेल मध्ये कार्यरत असलेला शिपाई नितीन खवडे याच्या आयडीवरून ट्रान्झीक्शन केल्याचे स्पष्ट झाले. यावरून नितीनला पुन्हा बुधवारी चौकशी करता बोलावून ठाणे पोलिसांनी अटक केली. अजिंक्य नागरगोजे हा इथीकल हॅकर म्हणून यवतमाळ पोेलिसांसाठी काम करत होता. याच काळात त्याची सायबर सेल मध्ये उठबस होती. नितीन खवडे याच्याशी त्याचा संबध आला आणि नितीने काही प्रतिष्ठांच्या मोबाईचा एसडीआर-सीडीआर अजिंक्यकडे फारवर्ड केला. ही लिंक ओपन झाली आहे. खासगी गुप्तहेराने यवतमाळातील प्रतिष्ठीतांचा डाटा का मागविला. त्यासाठी कोणी डिमांड केली. याचा देखिल शोध ठाणे क्राईम ब्राँच घेणार आहे. पोलीस दलातील फितूरा शिवाय डाटा बाहेर जाणे शक्य नाही, असे सुरूवातीपासूनच सांगण्यात येत होते.

टॅग्स :ArrestअटकCrimeगुन्हा