दोन लोकलमध्ये महिलांच्या डब्यात सीसीटीव्ही
By Admin | Updated: June 24, 2015 01:51 IST2015-06-24T01:51:44+5:302015-06-24T01:51:44+5:30
पश्चिम रेल्वेवरील एका लोकलच्या महिला डब्यात सीसीटिव्ही बसवण्यात आल्यानंतर आणखी दोन लोकलमध्ये महिला डब्यात सीसीटिव्ही बसवण्यात येणार असल्याचे

दोन लोकलमध्ये महिलांच्या डब्यात सीसीटीव्ही
मुंबई - पश्चिम रेल्वेवरील एका लोकलच्या महिला डब्यात सीसीटिव्ही बसवण्यात आल्यानंतर आणखी दोन लोकलमध्ये महिला डब्यात सीसीटिव्ही बसवण्यात येणार असल्याचे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले. त्यानंतर त्याची संख्या आणखी वाढवण्यात येईल, अशी माहीती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली.
गेल्या काही वर्षात लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांवर हल्ले होत असून त्यामुळे महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हे पाहता महिला डब्यात सीसीटिव्ही बसविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आला. त्यानुसार सीसीटीव्ही बसविण्यात आल्यानंतर त्याची मुंबई सेन्ट्रल ते अंधेरी अशी यशस्वीरित्या चाचणी घेण्यात आली होती. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर २९ मे पासून या लोकलच्या महिला डब्यातील सीसीटिव्ही प्रत्यक्षात कार्यान्वित करण्यात आले.