अलंकापुरीत ‘सीसीटीव्ही’चा वॉच
By Admin | Updated: November 13, 2014 23:54 IST2014-11-13T23:54:12+5:302014-11-13T23:54:12+5:30
संतश्रेष्ठ जगद्गुरू श्री ज्ञानोबारायांच्या 718 व्या संजीवन समाधीदिन सोहळ्यास अर्थात आळंदीच्या कार्तिकी यात्रेसाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले

अलंकापुरीत ‘सीसीटीव्ही’चा वॉच
शेलपिंपळगाव : संतश्रेष्ठ जगद्गुरू श्री ज्ञानोबारायांच्या 718 व्या संजीवन समाधीदिन सोहळ्यास अर्थात आळंदीच्या कार्तिकी यात्रेसाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले असून, सोहळ्यादरम्यान अलंकापुरीवर ‘तिसरा डोळा’ अर्थात सीसीटीव्हीचा वॉच असणार आहे. तसेच शनिवारपासून शहरात चारचाकी व जड वाहनांना नो एन्ट्री करण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांना हा सोहळा सुरक्षितपणो अनुभवता येणार आहे.
कार्तिकी सोहळा शनिवारपासून (दि. 15) सुरू होत आहे. श्री ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा साजरा करण्यासाठी अलंकापुरीत भाविकांनी हजेरी लावण्यास सुरुवात केली. येत्या दोन दिवसांत लाखो भाविकांची मांदियाळी आळंदीत दाखल होणार आहे. चालू वर्षी भाविकांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या पाश्र्वभूमीवर भाविकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने विविध उपाययोजनांची तरतूद केलेली आहे.
या सोहळ्याला महाराष्ट्रासह इतर राज्यांतील भाविक मोठय़ा संख्येने आळंदीत येतात. त्यामुळे हा सोहळा संपेपयर्ंत संपूर्ण शहरात गर्दी असते. सोहळा संपेपयर्ंत 24 तास खडा पहारा दिला जाणार आहे. यासाठी अलंकापुरीत 2 उपविभागीय पोलीस अधिकारी, 15 पोलीस निरीक्षक, 6क् सहायक पोलीस उपनिरीक्षक, 5 महिला पोलीस उपनिरीक्षक, 45क् पोलीस हवालदार, 1क्क् महिला पोलीस हवालदार, 45क् पुरुष होमगार्ड, 2क्क् महिला होमगार्ड, 2 एसआरपीएफचे प्लाटून, 1 बीडीडीएसचे पथक तैनात करण्यात आले आहे. तसेच या यात्र कालावधीत मालमत्तेचे गुन्हे घडू नये, म्हणून ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण यांच्याकडील 1 पोलीस निरीक्षक, 2 सहायक पोलीस निरीक्षक, 1क् पोलीस हवालदार, 1क् महिला पोलीस हवालदार, 6 आर्मगार्ड साध्या वेशात वॉच ठेवणार आहेत.
शहरातील प्रमुख असलेल्या चाकण चौक, वडगाव चौक, हजेरी मारुती, मरकळ चौक, पोलीस ठाणो परिसर, भराव रस्ता, नगरपरिषद परिसर, बसथांबा परिसर तसेच मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यासाठी पोलीस प्रशासनाकडून 5क् सीसीटीव्हीचा वॉच ठेवण्यात आला असून, देवस्थानचे 7क् व नगरपरिषदेचे फिरते सीसीटीव्ही शहरावर नजर ठेवणार आहेत. सीसीटीव्हीचे पोलीस ठाण्यातून सर्वेक्षण करण्यात येणार आहे. इंद्रायणी तीरावर कोणताही गैरप्रकार घडू नये, यासाठी सुरक्षारक्षक नेमण्यात आले आहेत. पोलीस प्रशासनाच्या फिरत्या गाडय़ा लूटमार करणा:या टोळ्यांवर नजर ठेवून संशयास्पद प्रकार आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करणार आहेत.
(वार्ताहर)
वाहतूक व्यवस्थेत बदल
शनिवारपासून (दि. 15) चाकण-शिक्रापूर महामार्गाकडून होणारी वाहतूक शेलगाव फाटय़ापासून कोयाळीमार्गे मरकळला वळविण्यात येणार आहे. तसेच पुणो-नगर महामार्गाकडून आळंदीकडे येणारी वाहतूक मरकळमार्गे चाकण-शिक्रापूर हायवेकडे वळविली जाणार आहे. पुणो-नाशिक महामार्ग आळंदी फाटय़ावरून जड वाहनांना शहराकडे प्रवेश दिला जाणार नाही. वडगाव रस्त्यावरील विश्रंतवड या ठिकाणाहून कोणत्याही वाहनांना शहरात प्रवेश दिला जाणार नाही. विश्रंतवड तसेच च:होली फाट्यावर वाहनांच्या पार्किगची सोय करण्यात आली आहे.
जड वाहनांना प्रवेश बंद
4कार्तिकी सोहळ्याचा संजीवन समाधी सोहळा अनुभवण्यासाठी राज्याच्या कानाकोप:यातून लाखो भाविक, दिंडय़ा किंवा पालखीमार्फत पायी वारी करत अलंकापुरीत दोन दिवसांत दाखल होणार आहेत. या पाश्र्वभूमीवर आळंदीतील गर्दी लक्षात घेऊन सोहळ्यादरम्यान अतिमहत्वाची वाहने वगळता संपूर्ण शहरात चारचाकी तसेच जड वाहनांना प्रवेश करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. शहराला जोडणा:या महत्त्वाच्या सर्व रस्त्यांवर बॅरिकेड्स लावण्यात येणार आहेत.
कार्तिकी सोहळ्याच्या पाश्र्वभूमीवर भाविकांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. संपूर्ण शहरात सीसीटीव्हीचा वॉच असणार आहे. शहरात कुठेही संशयास्पद वस्तू आढळून आल्यास भाविकांनी मदतकेंद्राशी किवा पोलिसांशी तत्काळ संपर्क साधावा. मंदिर परिसरातही चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
- कुमार कदम,
स. पो. निरीक्षक, आळंदी देवाची