मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर ड्रोन पेक्षा सीसीटीव्ही उपयुक्त
By Admin | Updated: September 8, 2016 14:55 IST2016-09-08T14:55:25+5:302016-09-08T14:55:25+5:30
मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर वाढते अपघात रोखण्यासाठी विविध पर्यायांची चाचपणी सुरु आहे. आधी एक्सप्रेस वे वर ड्रोन विमानाचा प्रयोग करण्यात आला.

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर ड्रोन पेक्षा सीसीटीव्ही उपयुक्त
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ८ - मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर वाढते अपघात रोखण्यासाठी विविध पर्यायांची चाचपणी सुरु आहे. आधी एक्सप्रेस वे वर ड्रोन विमानाचा प्रयोग करण्यात आला. आता सीसीटीव्हीची चाचणी सुरु आहे. या चाचण्यांमधून ड्रोनच्या तुलनेत सीसीटीव्ही अधिक प्रभावी असल्याचे समोर आले आहे.
ड्रोन विमानांना ४८ तासात एक्सप्रेस वे वर वाहतुकीचे नियम मोडणारी फक्त ४१ वाहने शोधता आली त्याचवेळी फक्त २१ तासात एका सीसीटीव्ही कॅमे-यांमध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारी ४,१८५ वाहने कैद झाली. एक्सप्रेस वे वर लेन कटिंग, ओव्हरस्पिडींग आणि अन्य नियमांच्या उल्लंघनामुळे मोठया प्रमाणावर अपघात होतात.
मळवली भागामध्ये सीसीटीव्ही कॅमे-याचा ट्रायल घेण्यात आला. एक्सप्रेस वे वर लक्ष ठेवण्यासाठी कुठल्या तंत्रज्ञानाचा उपयोग करायचा हे सरकारदरबारी अद्याप निश्चित झालेले नाही. पण ड्रोनच्या तुलनेत सीसीटीव्ही अधिक उपयुक्त असल्याचे ट्रायलमधून स्पष्ट झाले आहे.