टॅक्सींमध्ये सीसीटीव्ही?
By Admin | Updated: January 14, 2015 04:54 IST2015-01-14T04:54:34+5:302015-01-14T04:54:34+5:30
नवी दिल्लीत उबेर टॅक्सीचालकाकडून एका तरुणीवर बलात्कार केल्याची घटना घडली आणि महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुढे आला

टॅक्सींमध्ये सीसीटीव्ही?
मुंबई : नवी दिल्लीत उबेर टॅक्सीचालकाकडून एका तरुणीवर बलात्कार केल्याची घटना घडली आणि महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुढे आला. हे पाहता राज्यातील परिवहन विभागाकडून एकूणच प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पाऊल उचलण्यात येत असून, यात खाजगी टॅक्सींमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचा विचार असल्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सांगितले.
नवी दिल्लीतील घटनेनंतर राज्यातील परिवहन विभागाने खाजगी टॅक्सी कंपन्यांची बैठक घेऊन चालकांची तसेच टॅक्सींची माहिती मागविली. ही माहिती मागवितानाच सुरक्षेच्या उपायांसंदर्भातही अहवाल मागविला. टॅक्सीत पॅनिक बटण बसविण्यासंदर्भातही परिवहन विभाग आणि खाजगी टॅक्सी कंपनीकडून हालचाली सुरू आहेत. यानंतर आता परिवहन विभागाकडून खाजगी टॅक्सीतच सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासंदर्भात विचार सुरू असल्याचे रावते यांनी सांगितले. हे कॅमेरे टॅक्सीत किंवा त्याच्या मीटरमध्ये बसविलेले असतील.