सीबीएसई दहावी परीक्षेत मुलींची बाजी
By Admin | Updated: May 21, 2014 03:42 IST2014-05-21T03:42:04+5:302014-05-21T03:42:04+5:30
आदर्श घोटळ्यात अधिकाराचा गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवण्यात आल्याने निलंबित असलेले सनदी अधिकारी जयराज फाटक आणि प्रदीप व्यास यांना पुन्हा सेवेत सामावून घेण्यात आले

सीबीएसई दहावी परीक्षेत मुलींची बाजी
मुंबई : आदर्श घोटळ्यात अधिकाराचा गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवण्यात आल्याने निलंबित असलेले सनदी अधिकारी जयराज फाटक आणि प्रदीप व्यास यांना पुन्हा सेवेत सामावून घेण्यात आले. सरकारी नियमानुसार या अधिका-यांना दोन वर्षाहून अधिक काळ निलंबित ठेवणे शक्य नसल्याने निलंबन मागे घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले. फाटक आणि व्यास दोघेही दोन वर्षांपेक्षा अधिक काळासाठी निलंबित होते. तसेच या दोघांवरही विभागीय चौकशी सुरू करण्यात आलेली आहे. त्यांच्याविरोधात सुरु असणा-या चौकशीवर परिणाम होणार नाही याची काळजी घेवूनच त्यांना नवीन जबाबदारी देण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. आदर्श घोटाळ्याप्रकरणी चौकशी सुरू असताना केंद्रीय अन्वेषण विभागाने(सीबीआय) केलेल्या तपासात फाटक आणि व्यास यांच्यावर ठपका ठेवण्यात आल्यामुळे २२ मार्च २०१२ रोजी दोघांना निलंबित करण्यात आले होते. फाटक यांनी सांगितले की, मला कामावर पुन्हा रुजू करणे कायदेशीर प्रक्रियेनेच होत असून माझी नवीन नियुक्ती कोणत्या विभागात करण्यात आली आहे. हे स्पष्ट झालेले नाही’. फाटक २०१५मध्ये निवृत्त होणार आहेत. तर व्यास हे २०२३ मध्ये निवृत्त होणार आहेत. मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी असताना ह्यहायराईज बिल्डिंग कमिटीह्णची परवानगी न घेता आदर्शच्या इमारतीची उंची वाढविण्यासाठी फाटक यांनी परवानगी दिली व त्या मोबदल्यात या सोसायटीत त्यांच्या मुलाच्या नावे घर मिळविले, असा आरोप सीबीआयने केला होता. प्रदीप व्यास मुंबई शहर जिल्ह्णाचे जिल्हाधिकारी होते आणि त्यांच्या अनुमतीमुळेच ह्यआदर्शह्ण सोसायटी बांधण्यासाठी भूखंडाचे आरक्षण बदलण्यात आले होते, असा आरोप सीबीआयने ठेवला होता. (प्रतिनिधी)