सीबीआयकडून मार्केट यार्ड मधील व्यापा-यांवर छापे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2016 17:39 IST2016-12-22T17:39:43+5:302016-12-22T17:39:43+5:30
केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) पथकाने गुरुवारी मार्केट यार्ड येथील काही व्यापा-यांच्या दुकानांवर छापे टाकले

सीबीआयकडून मार्केट यार्ड मधील व्यापा-यांवर छापे
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 22 - केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) पथकाने गुरुवारी मार्केट यार्ड येथील काही व्यापा-यांच्या दुकानांवर छापे टाकले आहेत. सीबीआयच्या पथकाने सकाळीच छापा टाकून चौकशीला सुरुवात केल्याने व्यापारी गोंधळून गेले होते. वर्ल्ड वाईल्ड आॅईल फिल्ड मशीन्स कंपनीसह ईशान्य मोटर्सविरुद्ध बेकायदेशीरपणे तब्बल बारा कोटी रुपयांच्या नव्या नोटा बाळगल्याप्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान जुन्या नोटा तगड्या कमिशनवर बदलून देणारी व्यापा-यांची मोठी साखळी उघड झाली होती. यामध्ये मार्केट यार्डमधील काही व्यापा-यांचा समावेश असल्याचेही समोर आले होते.
शहरामध्ये जुन्या नोटा घेऊन नवीन नोटा बदलून देण्यारे व्यापारी आयकर विभागाच्याही टप्प्यात आले आहेत. सीबीआयनेही या व्यापा-यांविरुद्ध धडक कारवाई सुरू केली आहे. ज्या व्यापा-यांवर छापे टाकण्यात आले आहेत, त्यांच्यााकडे तूर्तास चौकशी सुरू असल्याचे वरिष्ठ अधिका-यांनी सांगितले. संध्याकाळपर्यंत या चौकशीमधून काय निष्पन्न झाले हे समजणार आहे.