इंद्राणी, संजीववर सीबीआयचा गुन्हा

By Admin | Updated: September 30, 2015 02:49 IST2015-09-30T02:49:09+5:302015-09-30T02:49:09+5:30

बहुचर्चित शीना बोरा हत्याकांडाप्रकरणी सीबीआयने मंगळवारी इंद्राणी मुखर्जी, तिचा पूर्वाश्रमीचा पती संजीव खन्ना यांच्यासह ड्रायव्हर श्यामवर राय यांच्यावर दिल्लीत गुन्हा दाखल केला आहे.

CBI prosecutes Indrani and Sanjeev | इंद्राणी, संजीववर सीबीआयचा गुन्हा

इंद्राणी, संजीववर सीबीआयचा गुन्हा

मुंबई : बहुचर्चित शीना बोरा हत्याकांडाप्रकरणी सीबीआयने मंगळवारी इंद्राणी मुखर्जी, तिचा पूर्वाश्रमीचा पती संजीव खन्ना यांच्यासह ड्रायव्हर श्यामवर राय यांच्यावर दिल्लीत गुन्हा दाखल केला आहे. या तिघांनाही मुंबई पोलिसांनी यापूर्वीच अटक केलेली आहे.
या हत्याकांड प्रकरणाची गुंतागुंत पाहता राज्य सरकारने याचा तपास सीबीआयकडे सोपविण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मंगळवारी सीबीआयने या आरोपींविरुद्ध कलम १२० ब, ३६४, ३०२, ३०७, ३२८, २०१, २०२, आयपीसीचे २०३ आणि शस्त्र अधिनियमाच्या ३ (२५) नुसार हा गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती सीबीआयचे प्रवक्ते कांचन प्रसाद यांनी दिली. बेलापूरस्थित सीबीआयच्या विशेष गुन्हे शाखेलाही या प्रकरणी अधिक चौकशी करण्यास सांगितले जाऊ शकते.

Web Title: CBI prosecutes Indrani and Sanjeev

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.