जिया खानच्या हत्येचा तपास सीबीआयकडे

By Admin | Updated: July 4, 2014 06:22 IST2014-07-04T06:22:30+5:302014-07-04T06:22:30+5:30

अभिनेत्री जिया खानने आत्महत्या केली की तिची हत्या करण्यात आली याचा तपास करण्याचे आदेश गुरुवारी उच्च न्यायालयाने सीबीआयला दिले़

CBI investigates the murder of Jiah Khan | जिया खानच्या हत्येचा तपास सीबीआयकडे

जिया खानच्या हत्येचा तपास सीबीआयकडे

मुंबई : अभिनेत्री जिया खानने आत्महत्या केली की तिची हत्या करण्यात आली याचा तपास करण्याचे आदेश गुरुवारी उच्च न्यायालयाने सीबीआयला दिले़
तपास करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नसून कामाचाही खूप ताण असल्याचे कारण सीबीआयने न्यायालयाला दिले होते़ यावर संतप्त झालेल्या न्या़ व्ही़एम़ कानडे व न्या़ प्रमोद कोदे यांच्या खंडपीठाने सीबीआयचे चांगलेच कान उपटले़ न्यायालय म्हणाले, सीबीआयसारख्या देशपातळीवरच्या संस्थेने मनुष्यबळ नसल्याचे कारण देणे चुकीचे आहे़ या संस्थेने अशी सबब दिल्यास नागरिकांनी न्यायाची कोणाकडून अपेक्षा करायची़ तसेच याआधी राज्य पोलिसांनी केलेल्या या प्रकरणीच्या तपासावर आम्ही भाष्य करत नाही़ पण जियाच्या आईने स्वतंत्र केलेल्या तपासात काही नवीन मुद्दे समोर आले आहेत़ त्यात पोलिसांनी ही आत्महत्या असल्याचा दावा केला आहे़ त्यामुळे याचा तपास सीबीआयकडे सोपवणे योग्य आहे, असेही न्यायालयाने या वेळी नमूद केले़ (प्रतिनिधी)

Web Title: CBI investigates the murder of Jiah Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.