सिंचन गैरव्यवहाराची सीबीआय चौकशी करा

By Admin | Updated: July 13, 2014 01:31 IST2014-07-13T01:31:16+5:302014-07-13T01:31:16+5:30

सिंचन क्षेत्रत झालेल्या गैरव्यवहाराची सीबीआयद्वारे चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी माजी मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी शनिवारी येथे केली.

CBI inquiry into irrigation mismanagement | सिंचन गैरव्यवहाराची सीबीआय चौकशी करा

सिंचन गैरव्यवहाराची सीबीआय चौकशी करा

पुणो : सिंचन क्षेत्रत झालेल्या गैरव्यवहाराची सीबीआयद्वारे चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी माजी मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी शनिवारी येथे केली. चितळे समितीने गैरव्यवहार उघड करण्याची आवश्यकता होती़ पण ती संधी या समितीने वाया घालविली, अशी टीकाही त्यांनी टीका केली़ 
युवक क्रांती दलातर्फे आयोजित चर्चासत्रत ते बोलत होत़े पांढरे म्हणाले, चितळे समितीने भ्रष्टाचाराची चौकशीच केली नाही़ राजकीय नेत्यांवरील जबाबदारी निश्चित करताना आपल्या कार्यकक्षेत ते नसल्याचे म्हटले आह़े यातील 8 ते 1क् प्रकरणांत खरेच सीबीआय चौकशी झाली तर राज्यातील नेते लालुप्रसाद यादव यांच्याप्रमाणो गजाआड जातील़ नियामक मंडळावर शासकीय आणि अशासकीय सदस्य नेमण्याची अट होती़ पण अशासकीय सदस्यांच्या नेमणुकाच झाल्या नाहीत़ अनेक बैठकांना समितीमधील इतर खात्यांचे सदस्य उपस्थितच राहात नव्हते, असा अनुभव आह़े (प्रतिनिधी)

 

Web Title: CBI inquiry into irrigation mismanagement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.