सायबर गुन्हेगारी तपासासाठी मुंबईत स्पेशल ब्रांच सुरु करण्याचा सीबीआयचा विचार
By Admin | Updated: March 1, 2016 17:21 IST2016-03-01T17:21:03+5:302016-03-01T17:21:03+5:30
वाढत्या सायबर गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय) मुंबईत स्पेशल ब्रांच सुरु करण्याचा विचार करत आहे

सायबर गुन्हेगारी तपासासाठी मुंबईत स्पेशल ब्रांच सुरु करण्याचा सीबीआयचा विचार
>ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. १ - वाढत्या सायबर गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय) मुंबईत स्पेशल ब्रांच सुरु करण्याचा विचार करत आहे. सीबीआय संचालक अनिल सिन्हा यांनी ही माहिती दिली आहे. बीकेसीमधील सीबीआयच्या 13 मजली इमारतीच्या उद्धाटनावेळी त्यांनी ही माहिती दिली आहे.
गेल्या 2 वर्षात सायबर गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी राज्य सरकारच्या मदतीने मुंबईत सीबीआयची स्पेशल ब्रांच सुरु करण्याचा विचार आहे असं अनिल सिन्हा बोलले आहेत. सध्या अशा प्रकारची ब्रांच फक्त दिल्लीतच आहे . सायबर गुन्हेगारी वाढत आहे आणि त्यासाठी तज्ञांच्या वेगळ्या पथकाची गरज आहे. त्यासाठी आता मुंबईतही ब्रांच सुरु करण्याची गरज असल्यांच मत अनिल सिन्हा यांनी व्यक्त केलं आहे.
मुंबईत सीबीआयने खुप मोठे घोटाळे उघड केले आहेत. ज्यामध्ये हर्षद मेहता, तेलगी, आदर्श सारख्या घोटाळ्यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त सीबीआय शीन बोरा तसंच नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणांचाही तपास करत आहे. राज्य सरकार आणि न्यायालय अनेक प्रकरणांचा तपास सीबीआयकडे सोपवत आहेत त्यामुळे सीबीआयवरील जबाबदारी वाढत असल्याचंही अनिल सिन्हा यांनी मान्य केलं आहे.