इंद्राणीच्या कोठडीसाठी सीबीआयचा अर्ज
By Admin | Updated: October 7, 2015 02:19 IST2015-10-07T02:19:49+5:302015-10-07T02:19:49+5:30
शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी आणि इतर दोघांची कोठडी मिळविण्यासाठी सीबीआयने बुधवारी विशेष न्यायालयाकडे अर्ज दाखल केला आहे. सध्या हे सर्वजण न्यायालयीन कोठडीत आहेत.

इंद्राणीच्या कोठडीसाठी सीबीआयचा अर्ज
नवी दिल्ली : शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी आणि इतर दोघांची कोठडी मिळविण्यासाठी सीबीआयने बुधवारी विशेष न्यायालयाकडे अर्ज दाखल केला आहे. सध्या हे सर्वजण न्यायालयीन कोठडीत आहेत.
कोणत्या परिस्थितीत इंद्राणीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्या तपासणी अहवालाबाबत दोन रुग्णालयांनी दिलेले विसंगत अहवाल, तिला विष देऊन मारण्याचा प्रयत्न झाला किंवा काय, आदी बाबींचा सीबीआयला तपास करायचा आहे. इंद्राणीचे पती पीटर मुखर्जी यांची चौकशी करायची असल्यामुळे त्यांना देश सोडून न जाण्याचा आदेश
दिला जाईल, असे सीबीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले. इंद्राणीच्या फर्मने केलेल्या आर्थिक व्यवहारांचा विस्तृत तपशील, आयकर रिटर्न तसेच अन्य माहितीही मिळवायची आहे. इंद्राणीचे पूर्वाश्रमीचे पती संजीव खन्ना आणि वाहनचालक श्यामवीर रवी यांच्या आर्थिक व्यवहाराचाही तपास करायचा आहे. मुंबई पोलिसांनी अद्याप शीनाच्या बँक खात्यांची तपासणी केलेली नाही.
सीबीआयच्या अर्जावर आज निर्णय
शीना बोरा हत्याप्रकरणी मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी, तिचा दुसरा पती संजीव खन्ना आणि ड्रायव्हर श्याम राय यांची कारागृहातच चौकशी करण्याची परवानगी मिळावी, यासाठी सीबीआयने केलेल्या अर्जावर दंडाधिकाऱ्यांनी बुधवारपर्यंत निर्णय राखून ठेवला आहे.
विषबाधेची शक्यता
इंद्राणीचे प्रभावशाली व्यक्तींशी राहिलेले संबंध पाहता विषप्रयोग करून तिला संपविण्याचा प्रयत्न झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. तिचे आर्थिक व्यवहार पाहता बनावट कंपन्यांच्या नावाने काळ्या पैशाचा वापर झाल्याची शक्यता असल्याचे एका अधिकाऱ्याने म्हटले.