सीबीसीएस प्रणाली लागू करावी
By Admin | Updated: April 11, 2015 02:28 IST2015-04-11T02:28:54+5:302015-04-11T02:28:54+5:30
शिक्षणात समानता, सक्षमता आणि उत्कृष्टता आणण्यासाठी चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टम (सीबीसीएस ) प्रणाली आवश्यक आहे

सीबीसीएस प्रणाली लागू करावी
मुंबई : शिक्षणात समानता, सक्षमता आणि उत्कृष्टता आणण्यासाठी चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टम (सीबीसीएस ) प्रणाली आवश्यक आहे. सर्व केंद्रीय आणि राज्य विद्यापीठांनी आपल्या अभ्यासक्रमात ही प्रणाली लागू करुन विद्यार्थ्यांना जास्तीतजास्त विषयांमध्ये अध्ययन करण्याचे स्वातंत्र्य द्यावे, असे मत विद्यापीठ अनुदान आयोगाचे (यूजीसी) उपाध्यक्ष प्रा.एच. देवराज यांनी येथे व्यक्त केले.
महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय वर्धा आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीने मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधील कविवर्य कुसुमाग्रज मराठी भाषा भवन येथे आयोजित चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टम विषयावर आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते.
प्रा. देवराज यांनी आपल्या भाषणात सीबीसीएस प्रणाली समजवून सांगत बदलत्या शैक्षणिक वातावरणात विद्यार्थ्यांना ती कशी आवश्यक आहे हे पटवून दिले. नॅशनल क्वालिफिकेशन कमिशनने शिक्षणात समरुपता आणण्यावर भर दिला असून त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी युजीसीने सीबीसीएस प्रणालीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपल्या आवडीचे विषय शिकण्याची मुभा दिली आहे. विद्यार्थ्यांचे जीवन घडविण्यासाठी त्यांच्यात सक्षमता आणि उत्कृष्टता निर्माण करण्यासाठी सीबीसीएसचा विकास करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)