स्फोटाचे कारण गुलदस्त्यात
By Admin | Updated: August 26, 2014 04:09 IST2014-08-26T04:09:25+5:302014-08-26T04:09:25+5:30
महाड औद्योगिक वसाहतीमधील एम्बायो अर्थात एमलिन बायोपॉरमासिटीकल कंपनीत रविवारी पहाटे झालेल्या भीषण स्फोटात एका कामगाराचा मृत्यू झाला, तर ६ कामगार जखमी झाले़ त्यापैकी तिघांना मुंबईत हलविण्यात आले

स्फोटाचे कारण गुलदस्त्यात
बिरवाडी : महाड औद्योगिक वसाहतीमधील एम्बायो अर्थात एमलिन बायोपॉरमासिटीकल कंपनीत रविवारी पहाटे झालेल्या भीषण स्फोटात एका कामगाराचा मृत्यू झाला, तर ६ कामगार जखमी झाले़ त्यापैकी तिघांना मुंबईत हलविण्यात आले. कारखाना निरीक्षक गिरी यांनी सोमवारी कंपनीच्या एमएमपी-२ म्हणजेच मल्टीप्रोडक्ट प्लँट नं. २ मधील घटनास्थळाची पाहणी केली. मात्र जखमींवर उपचार सुरू असल्याने नंतर अपघाताचे नेमके कारण समोर येईल असे सांगितले. या घटनेची नोंद महाड एमआयडीसी पोलिसांत आकस्मात मृत्यू अशी करण्यात आली़ यातील गणेश कांबळे (२४) याचा मृत्यू स्फोटात झाला असून ६ कामगार जखमी झाल्याचे प्रभारी अधिकारी नंदकिशोर सस्ते यांनी नमूद केले. कारखाना निरीक्षकांच्या अहवालानंतर दोषींविरोधात गुन्हा दाखल केला जाईल, असे ते म्हणाले. (वार्ताहर)