तलवारीने केक कापणाऱ्याला अटक
By Admin | Updated: June 23, 2016 04:38 IST2016-06-23T04:38:23+5:302016-06-23T04:38:23+5:30
तलवारीने केक कापणे येथील तरुणाच्या अंगलट आले. तलवार फिरविताना पोलिसांना दिसल्यानंतर अटक करण्यात आली.

तलवारीने केक कापणाऱ्याला अटक
अहमदनगर : तलवारीने केक कापणे येथील तरुणाच्या अंगलट आले. तलवार फिरविताना पोलिसांना दिसल्यानंतर अटक करण्यात आली.
बालिकाश्रम रोडवरील बोरुडे मळ््यात मंगळवारी रात्री साडेदहा वाजता पोलिसांनी ही कारवाई केली. तोफखाना पोलिसांची गस्त सुरू असताना बालिकाश्रम रोडवरील सिंधू मंगल कार्यालयासमोर काही तरुण वाढदिवसाच्या निमित्ताने एकत्र जमले होते. वाढदिवसानिमित्त चेतन अमृत हजारे याने तलवारीने केक कापल्यानंतर तो तलवार हवेत फिरवित असल्याचे पोलिसांनी पाहिले. त्याची चौकशी करून धारदार तलवार जप्त करून त्याला ताब्यात घेतले. (प्रतिनिधी)