जनावरांचा मास नेणारा टेंपो पकडला..
By Admin | Updated: July 6, 2016 19:41 IST2016-07-06T19:31:29+5:302016-07-06T19:41:01+5:30
नगर येथून येणाऱ्या एम एच 04 एचडी 7868 या टेम्पो गाडीचा कांबा येथील तरूणांना संशय आला आणि त्यांनी सदर गाडी आडवली. सदर गाडीत जनावरांचे मास असल्याचे निदर्शनास येताच

जनावरांचा मास नेणारा टेंपो पकडला..
ऑनलाइन लोकमत
टिटवाळा, दि. ६ :- नगर येथून येणाऱ्या एम एच 04 एचडी 7868 या टेम्पो गाडीचा कांबा येथील तरूणांना संशय आला आणि त्यांनी सदर गाडी आडवली. सदर गाडीत जनावरांचे मास असल्याचे निदर्शनास येताच त्यांनी टिटवाळा पोलीसांना खबर दिली. पोलिसांनी सदर टेम्पो ताब्यात घेतला असून, संबधीतांवर महाराष्ट्र प्राणी रक्षक अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात अधिक माहिती अशी की, नगर येथून एम एच 04 एचडी 7868 हा टेम्पो कल्याण च्या दिशेने जनावरांचे मास घेऊन येत होता. सदर टेम्पो कांबा गावाच्या बस स्टँड जवळ येताच येथे असणाऱ्या काही स्थानिक तरूणांना सदर चालकाचा संशय आला. त्यांनी सदर टेम्पो अडविला असता, त्यात जनावरांचे मास निदर्शनास आले.
याबाबतीत ततरूणांनी टिटवाळा पोलिसांना खबर दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पहाणी केली असता टेम्पो मध्ये बैलाच किंवा गाईच 10 किलो मास आढळून आले. या बाबत पोलिसांनी चालक फकीर महमद बाबुलाल शेख (45), मुक्तानगर अहमदनगर, क्लिनर वली महमद अकबर अली शेख (49), बांद्रा नौपाडा मुंबई,51 यांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर महाराष्ट्र प्राणी रक्षक अधिनियम व भादवी 429/34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर मास बैलाच आहे की गाईच याची तपासणी होण्यासाठी 50 ग्रॅम च्या सहा बाटल्या मास वैद्यकीय प्रयोगशाळेत तपासणी करिता पाठविण्यात आला आहे. अधिक तपास टिटवाळा पोलीस करत आहेत.