शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

Raj Thackeray : राष्ट्रवादीच्या जन्मानंतरच जातीपातीच्या राजकारणाला सुरूवात, शरद पवारांनाच ते हवंय - राज ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2022 21:11 IST

जातीतून आम्ही बाहेर पडत नाही, तर हिंदू कधी होणार?; राज ठाकरेंचा सवाल. ज्या महाराष्ट्रानं देशाला दिशा दिली तो आज जातीपातीत अडकलाय : राज ठाकरे

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शनिवारी गुढी पाडव्यानिमित्त आयोजित मेळाव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. "आपण जातीपातीमध्ये गुंतून पडणार असू तर कोणतं हिंदू आणि हिंदुत्व आपण घेऊन बसणार आहोत. हिंदू हा हिंदू मुस्लीम दंगलीत फक्त हिंदू असतो. तो २६ जानेवारी आणि १५ ऑगस्टला भारतीय होतो. चीननं आक्रमण केल्यावर त्याला आपण कोण कळतच नाही. मग ज्यावेळी त्याला कळतच नाही तेव्हा तो मराठी, गुजराती, तमिळ असा होतो. मग तो ज्यावेळी तो मराठी होतो, त्यावेळी तो  मराठा, ब्राह्मण, आग्री असा होतो. राष्ट्रवादी काँग्रेसला, शरद पवारांना ही गोष्ट हवी आहे," असं म्हणत राज ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला.

"जातीपातीचं राजकारण राष्ट्रवादी काँग्रेसला, शरद पवारांना हवं आहे. ज्यावेळी १९९९ मध्ये जेव्हा राष्ट्रवादीचा जन्म झाला तेव्हा जातीपातीचं राजकारण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात सुरू झालं. यापूर्वी जात ही जातीचा अभिमान होता. परंतु १९९९ मध्ये राष्ट्रवादीच्या जन्मानंतर त्यांनी जातीचा द्वेष करायला लावला," असं म्हणत राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला.

बाबासाहेब पुरंदरे सॉफ्ट टार्गेट"बाबासाहेब पुरंदरे सॉफ्ट टार्गेट होते. इतिहास ना वाचता तो लिहिलाय कोणी हे पाहिलं गेलं. ते ब्राह्मण आहेत, असं म्हणून टीका व्हायची. छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं जात पात सोडून एक व्हा, त्याच महाराष्ट्रात आज जातीपातीवरून भांडणं सुरू आहेत, राजकारण सुरू आहे. जातीतून आम्ही बाहेर पडत नाही, तर हिंदू कधी होणार," असाही सवाल त्यांनी केला. ज्या महाराष्ट्राची परंपरा वैभवशाली आहे, ज्या महाराष्ट्रानं देशाला दिशा दिली तो महाराष्ट्र आज जातीत खितपत पडला आहे, असंही ते म्हणाले.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेSharad Pawarशरद पवारgudhi padwaगुढीपाडवाMaharashtraमहाराष्ट्र