शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे विधान असंवेदनशील नव्हते, तर...", कर्जमाफीबद्दलच्या वादग्रस्त विधानावर बाबासाहेब पाटलांचा खुलासा
2
VIDEO: "निवडून यायचं म्हणून आम्ही आश्वासने देतो"; सहकार मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर चोळलं मीठ, म्हणाले, "वेळ मारण्यासाठी..."
3
इंजिनिअरच्या घरात सापडलं मोठं घबाड; नोटांचा ढीग आणि सोनं-चांदीही जप्त
4
निष्काळजीपणाचा कळस! सिरपनंतर आता गोळ्या... लाखो मुलांना दिलं टेस्टमध्ये फेल झालेलं औषध
5
“CJI गवई दलित असल्यानेच सवर्णाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न, कारवाई व्हावी”: रामदास आठवले
6
डोनाल्ड ट्रम्प भारतीयांना आणखी एक धक्का देणार! H-1B व्हिसा नियमांमध्ये आणखी बदल करण्याची तयारी
7
Yashasvi Jaiswal Record : यशस्वीचा मोठा पराक्रम; गांगुली- द्रविडसह गिल अन् विराटलाही टाकले मागे
8
LG Electronics IPO: एलजी इलेक्ट्रॉनिक्स आयपीओचं आज अलॉटमेंट, तुम्हाला मिळालेत का शेअर्स? कसं चेक कराल?
9
हिंदू अभिनेत्याशी दुसरं लग्न केल्याने ट्रोल करणाऱ्यांना सारा खानचं सडेतोड उत्तर, म्हणाली- "आमचा धर्म..."
10
"ते माझ्यावर हसले...", ऑफिसमध्ये मानसिक आरोग्याबाबत तरुणीला आला वेदनादायी अनुभव
11
“सगळ्याच योजना कायम चालतात असे नाही”; ‘आनंदाचा शिधा’ योजनेवरील अजित पवारांचे विधान चर्चेत
12
दिवाळी बोनसवर किती टॅक्स? रोख रक्कम, मिठाई की गिफ्ट व्हाउचर; कर नियमांबद्दलच्या 'या' चुका टाळा!
13
संजय राऊतांच्या गैरहजेरीत बैठका! ‘मातोश्री’वर केली महत्त्वाची खलबते, ठाकरे बंधूंनी डावललं?
14
KL राहुलनं सेंच्युरीत जमलं नाही ते केलं; पण क्लासला दांडी मारून आलेल्या चाहत्यांसमोर नको ते घडलं
15
प्लॅन A विष, प्लॅन B गोळीबार... नवऱ्याचा काटा काढण्यासाठी बायकोचा बॉयफ्रेंडसह भयंकर कट
16
...तर मग लाडक्या बहिणींना योजनेचे १५०० रुपये मिळणार नाहीत का? अजित पवारांनी दिले उत्तर
17
३० वर्षांनी शुक्र-शनीचा समसप्तम योग; ११ ऑक्टोबरला ५ राशींना लाभ, इतरांनी घ्या 'ही' काळजी!
18
तुम्हीही गृह कर्ज काढलंय? CA च्या ५ स्मार्ट हॅक्सने ५० लाखांच्या कर्जात वाचवा तब्बल ३६ लाख रुपये
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींची दिवाळी गोड होणार! सप्टेंबरचे १५०० रुपये लवकरच मिळणार, तारीख आली समोर
20
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ७.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, भयंकर त्सुनामीचा इशारा

राज्यातील रस्ते, वस्त्यांची जातिवाचक नावे बदलणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 05:46 IST

ग्रामविकास विभागाचा शासन निर्णय जारी, नवी कार्यपद्धती निश्चित, ग्रामपंचायतींना प्रस्ताव देण्याचे अधिकार, महापुरुषांच्या नावाला प्राधान्य

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : ग्रामविकास विभागाने राज्याच्या ग्रामीण भागातील वस्त्यांची आणि रस्त्यांची जातिवाचक नावे बदलून नवीन नावे देण्याबाबतची कार्यपद्धती निश्चित केली आहे. त्यानुसार  संबंधित गावाला  ग्रामसभेत तसा ठराव करून तो  गटविकास अधिकाऱ्याला सादर  करावा  लागणार आहे. या प्रस्तावावर निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.  

गावाचे नाव बदलण्याची कार्यवाही सामान्य प्रशासन विभागाकडून करण्यात येते. त्यामुळे ग्रामविकास विभागाने  जातिवाचक नाव बदलून नवे नाव देण्याबाबतचे  अधिकार  जिल्हाधिकाऱ्यांना असल्याचे गुरुवारी जारी केलेल्या शासन निर्णयात स्पष्ट केले आहे. 

सामाजिक न्याय विभागाचाही पुढाकारशहरी आणि ग्रामीण भागातील वस्त्यांची  तसेच रस्त्यांची जातिवाचक नावे बदलून जातिवाचक नावाऐवजी महापुरुषांची,  लोकशाही मूल्यांशी निगडित नावे देण्याचा शासन निर्णय सामाजिक न्याय विभागाने घेतला  आहे. 

ग्रामसभेचा ठराव, त्याला जिल्हाधिकाऱ्यांची मान्यताया पार्श्वभूमीवर ग्रामविकास विभागाने जातिवाचक नावे बदलण्यासाठी कार्यपद्धती ठरवली आहे. त्यानुसार एखाद्या वस्तीचे वा रस्त्याचे जातिवाचक नाव बदलायचे झाल्यास  संबंधित गावाने ग्रामसभेत तसा ठराव करून त्याबाबतचा प्रस्ताव गटविकास अधिकाऱ्यांना सादर करावा. गटविकास अधिकारी यांनी  प्रस्ताव तपासून तो जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठवावा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी हा प्रस्ताव तपासून संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करावा आणि जिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्तावाला मंजुरी द्यावी, असे निर्णयात आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra to Rename Caste-Based Roads, Settlements; District Collectors Empowered

Web Summary : Maharashtra's villages will rename caste-based roads and settlements. Gram Sabhas must pass resolutions submitted to district collectors for approval. The social justice department initiated this change, promoting names linked to great leaders and democratic values.
टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत