अजित पवार यांच्या गाडीतून रोकड जप्त

By Admin | Updated: October 9, 2014 04:42 IST2014-10-09T04:42:38+5:302014-10-09T04:42:38+5:30

परळी नाक्यावरील चेकपोस्टवर मंगळवारी सकाळी एका स्कॉपिओमधून ४ लाख ८५ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.

Cash seized from Ajit Pawar's car | अजित पवार यांच्या गाडीतून रोकड जप्त

अजित पवार यांच्या गाडीतून रोकड जप्त

गंगाखेड (जि़ परभणी) : परळी नाक्यावरील चेकपोस्टवर मंगळवारी सकाळी एका स्कॉपिओमधून ४ लाख ८५ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. दरम्यान, ज्या बॅगांमधून ही रोकड जप्त करण्यात आली, त्या माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि स्वीय सहाय्यक देशमुख यांच्या असल्याचे चालक कृष्णा हजारे याने सांगितले.
स्कॉर्पिओमधील बॅग लातूर येथील शेळके यांच्याकडे देण्यासाठी राष्ट्रवादीचे परभणी जिल्हाध्यक्ष विजय भांबळे यांच्या सांगण्यावरुन लातूरला जात असल्याचे चालक हजारे याने पोलिसांना सांगितले. स्कॉर्पिओमध्ये एकूण चार बॅगा होत्या. त्यापैकी दोन बॅगला लॉक असल्याने त्या ची तपासणी चेकपोस्टवर करता आली नाही. त्यामुळे पथकाने उपविभागीय पोलिस अधिकारी शंकर केंगार यांना ही माहिती कळविली. त्यावरुन गाडी गंगाखेड पोलीस ठाण्यात आणण्यात आली़ त्यानंतर पंचासमक्ष बॅग उघडून बघितली असता चालक हजारे यांच्या सांगण्यानुसार माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बॅगमध्ये कपडे, व्हिजीटींग कार्ड व चार लाख रुपये मिळून आले. तर स्वीयसहाय्यक देशमुख यांच्या बॅगमध्ये कपडे, ओळखपत्र व ८५ हजार रुपयांची रोकड आढळली. पोलिसांनी ही रोकड जप्त केली आहे. दरम्यान, संबंधितांकडून या पैशाच्या स्त्रोताचे स्पष्टीकरण मागविले असून, त्यानंतर निवडणूक खर्च अधिकारी यांना तसा अहवाल पाठवून पुढील कार्यवाही करणार असल्याचे पोलिस अधीक्षक अनंत रोकडे यांनी गंगाखेड येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

Web Title: Cash seized from Ajit Pawar's car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.