कोपरीतील जुगार अड्डय़ावर धाड : आठ लाख 65 हजारांची रोकड हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2016 23:20 IST2016-07-18T23:20:12+5:302016-07-18T23:20:12+5:30
कोपरीच्या महानगर टेलिफोन निगम लि. कार्यालयाजवळील आर.के. बेकरीच्या बाजूला असलेल्या बाबू नाडर याच्या जुगार अड्डय़ावर ठाणो गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-5 आणि कोपरी पोलिसांनी संयुक्तपणे

कोपरीतील जुगार अड्डय़ावर धाड : आठ लाख 65 हजारांची रोकड हस्तगत
ठाणे : कोपरीच्या महानगर टेलिफोन निगम लि. कार्यालयाजवळील आर.के. बेकरीच्या बाजूला असलेल्या बाबू नाडर याच्या जुगार अड्डय़ावर ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-5 आणि कोपरी पोलिसांनी संयुक्तपणे धाड टाकून आठ लाख 65 हजारांची रोकड आणि जुगाराची सामग्री जप्त केली. या वेळी जुगार खेळणा:या आणि अड्डा चालवणा:या अशा 29 जणांना पोलिसांनी अटक केली.
कोपरीतील नाडरच्या जुगार अड्डय़ावर ह्यकाटी पत्ताह्ण तसेच ह्यपपलूह्ण या नावाने तीनपत्त्यांचा जुगार बेकायदेशीरपणो खेळला जात असल्याची माहिती युनिट-5 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पासलकर यांना मिळाली होती. तिच्या आधारे पासलकर यांच्यासह निरीक्षक मदन बल्लाळ, सहायक पोलीस निरीक्षक विजय दळवी, उपनिरीक्षक शिवराज बेंद्रे आणि कोपरीचे पोलीस निरीक्षक एम.डी. जाधव यांच्या पथकाने 17 जुलै रोजी रात्री 10.30 ते 12 वा.च्या सुमारास त्या ठिकाणी धाडसत्र राबवले. या धाडीत त्या ठिकाणी जुगार खेळणारे किशोर शेलार, समसुद्दीन मलिक, अनिल भरवे, हेमंत कानडे, सचिन जटाटे, बबन भुवड तसेच अड्डा चालवणारा नाडर याचे कामगार दत्ताराम घाणोकर, तुकाराम काटकर आणि पवन बद्रा आदींना अटक केली. यातील मुख्य आरोपी नाडर हा मात्र नेहमीप्रमाणो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला. त्याचाही शोध सुरू असल्याचे कोपरी पोलिसांनी सांगितले.