शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

नगदी पीक असलेला कांदाही आता रडवतोय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 23:28 IST

राज्यात सुमारे चार ते साडेचार लाख हेक्टर क्षेत्रात कांद्याचे उत्पादन घेतले जाते.

नाशिक- राज्यात सुमारे चार ते साडेचार लाख हेक्टर क्षेत्रात कांद्याचे उत्पादन घेतले जाते. यात खरिपातील लाल कांद्याचाही समावेश असून, केवळ खरिपाच्या हंगामात अर्ली खरिपाच्या पोळ कांद्याचा आणि लेट खरिपातील रांगड्या कांद्यासह राज्यभरात सुमारे दीड ते दोन लाख हेक्टरवर कांद्याचे उत्पादन घेतले जाते. कांदा लागवडीवर मान्सूनचे पर्जन्यमान आणि अन्य घटकांचा प्रभाव होत असला तरी गेल्या वर्षी खरिपाच्या लाल कांद्याला चांगला भाव मिळाला होता. यावर्षीही कांद्याचे चांगले पैसे मिळण्याच्या आशेने राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी तयारीला लागला असून, मोठ्या प्रमाणात कांदा बियाणांची खरेदी होत असल्याने राज्यात यावर्षी कांद्याचे बंपर उत्पादन होण्याचे संकेत असल्याचे मत कृषितज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.देशात महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात व राज्यस्थानमध्ये कांद्याचे उत्पादन घेतले जाते. यात दक्षिणेकडील कर्नाटक व आंध्र प्रदेशातून खरिपाच्या लागवडीला सुरुवात होत असून, राज्यात सोलापूरसह पुण्यातील लोणंद, चाकण या भागात अर्ली खरिपातील कांद्याची लागवड होते, तर कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगाव परिसरात म्हणजेच उत्तर महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यासह नाशिकच्या मालेगाव, नांदगाव चांदवड, येवला, सिन्नर या भागातही मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड होते. राज्यातील कांदा उत्पादनाच्या एकूण ७० ते ८० टक्के कांद्याचे उत्पादन एकट्या नाशिक जिल्ह्यात होत असले तरी आता जळगाव आणि मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यात व औरंगाबादच्या पैठणसारख्या भागातही कांद्याचे उत्पादन घेण्यास शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे.या वर्षी नाशिक जिल्ह्यात जवळपास सव्वा लाख हेक्टरवर कांदा लागवड होण्याची शक्यता आहे. सोलापूर, चाकण, लोणंद, पैठण, उस्मानाबादसह नाशिकच्या कमी पावसाच्या भागात शेतकºयांना दुसºया नगदी पिकाचा पर्याय नाही. या वर्षी हवामान विभागाने मान्सून समाधानकारक असल्याचे सूतोवाच केल्यामुळे शेतकºयांनी खरिपात लाल कांदा लागवडीची तयारी सुरू केली आहे, परंतु मान्सूनच्या आगमानानंतर किती क्षेत्रावर कांदा लागवड होणार हे चित्र अधिक स्पष्ट होईल, असे नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील यांनी सांगितले.>कांद्यापासूनमिळणारे उत्पन्नकांद्याचे प्रतिएकर सरासरी १०० क्विंटल उत्पादन होते. त्यास सरासरी बाजारभाव ५०० रुपये मिळाल्यास एकूण ५० हजार रुपये उत्पन्न शेतकºयाला मिळते. त्यातून विक्र ीसाठी येणारा खर्च व हमाली-तोलाई ५०० रु पये, वाहतूक खर्च ४ हजार रुपये असा एकूण ४,५०० रुपये विक्र ी साठीचा खर्च वजा जाता केवळ ४५ हजार ५०० रुपये उत्पन्न शेतकºयांच्या हाती उरते.>भांडवलाची चणचणएकीकडे उन्हाळ कांद्याला अपेक्षित बाजारभाव मिळत नसताना, दुसरीकडे जिल्हा बँकेनेही या वर्षी खरीप कर्जपुरवठ्याचे लक्ष्य हजार कोटींनी घटविले आहे. या वर्षी खरिपासाठी जिल्हा बँकेकडून केवळ ५०० कोटी कर्जपुरवठा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अशा स्थितीत राज्य सरकारच्या किचकट अटी-शर्तींमुळे अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले आहेत. बँकेचे थकबाकीदार असल्याने त्यांना खरिपाच्या पिकासाठी कर्ज उपलब्ध होत नसून, कांदा लागवडीसाठी भांडवलाची चणचण भासत आहे.>कांदा उत्पादन खर्च (एकरी)बियाणे- ५ हजार रुपयेजमीन मशागत- ४ हजार रुपयेलागवड- ७ हजार रुपयेखते- १५ हजार रुपयेऔषधे- ७ हजार रुपयेकाढणी- ७ हजार रुपयेचाळीत साठवण मजुरी- ३ हजार रुपयेतण काढणे (किमान तीन वेळा)- ७ हजार रुपयेएकरी किमान खर्च- ५५ हजार रु पये

टॅग्स :onionकांदा