शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

मालवाहतूक केल्यास खासगी प्रवासी बसेसचा परवाना रद्द होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2019 19:16 IST

प्रवासी वाहतुकीचा परवाना असताना मालवाहतूक करणाऱ्या खाजगी बसेस चा परवाना रद्द करण्याच्या सूचना परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी प्रशासनाला दिली आहे.

ठळक मुद्देप्रवासी वाहतुकीचा परवाना असताना मालवाहतूक करणाऱ्या खाजगी बसेस चा परवाना रद्द करण्याच्या सूचना परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. एसटी बसमध्येही विनापरवानगी कुरियर नेताना आढळल्यास चालक व वाहकावर  प्रथम निलंबन, तर दुसऱ्या वेळेस बडतर्फीची कारवाई करणार

- चेतन ननावरे मुंबई - प्रवासी वाहतुकीचा परवाना असताना मालवाहतूक करणाऱ्या खाजगी बसेस चा परवाना रद्द करण्याच्या सूचना परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. प्रवासी बसेस मालवाहतूक करताना दिसल्यास त्या जप्त करण्यास रावते यांनी सांगितले आहे. याशिवाय एसटी बसमध्येही विनापरवानगी कुरियर नेताना आढळल्यास चालक व वाहकावर  प्रथम निलंबन, तर दुसऱ्या वेळेस बडतर्फीची कारवाई करणार असल्याचे रावते यांनी स्पष्ट केले. 

यासंदर्भात नव्याने नियमावली तयार करण्यात येणार आहे. एसटी प्रमाणेच खासगी बसेसमधील प्रवाशांना प्रति प्रवासी २० किलो सामान नेता येईल. तसेच खाजगी बसेसला प्रवासी नसताना कोणत्याही मालाची वाहतूक करता येणार नाही. एसटी बसेसमध्ये सीसीटीव्ही लावण्याबाबतही विचार करत असल्याचे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. तसेच खाजगी बसेसमध्येही सीसीटीव्ही लावता येतील का? याचा विचार करत असल्याचे रावते यांनी स्पष्ट केले.एसटी बस मध्ये सापडलेल्या स्फोटकांच्या घटनेनंतर तातडीने परिवहन विभागाने कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी परिवहन, गृह विभागाचे उच्च स्तरीय अधिकाऱ्यांची बैठक आज पार पडली. त्यावेळी रावते यांनी या सूचना केल्या आहेत. यावेळी पोलिसांना राज्यात कुठेही आणि कधीही खासगी व एसटी बसेसची तपासणी करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. तसेच प्रत्येक एसटी स्टँडवर पोलीस चौकी उभारण्याबाबत विचारणा करण्यात आली आहे.एसटीमधून विनापरवाना मालवाहतूक किंवा कुरिअर वाहतूक केल्यास चालक व वाहक दोघांनाही जबाबदार ठरवण्यात येईल. त्यासाठी प्रथम निलंबन करून चालक व वाहकाला एक संधी देण्यात येईल. मात्र दुसऱ्यांदा हीच गोष्ट करताना आढळल्यास थेट बडतर्फीची कारवाई करून संबंधित कर्मचाऱ्याला घरचा रस्ता दाखवण्यात येईल, असेही रावते यांनी सांगितले. 

टॅग्स :Bus DriverबसचालकMaharashtraमहाराष्ट्र