आत्महत्या प्रकरणात डॉक्टरांना अटकपूर्व जामीन
By Admin | Updated: August 23, 2014 00:27 IST2014-08-23T00:27:34+5:302014-08-23T00:27:34+5:30
वैश्यंपायन वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉ. किरण जाधव यांच्या आत्महत्येप्रकरणी चार डॉक्टरांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. एस. मराठे यांनी गुरुवारी अटकपूर्व जामीन मंजूर केला.

आत्महत्या प्रकरणात डॉक्टरांना अटकपूर्व जामीन
सोलापूर : वैश्यंपायन वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉ. किरण जाधव यांच्या आत्महत्येप्रकरणी चार डॉक्टरांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. एस. मराठे यांनी गुरुवारी अटकपूर्व जामीन मंजूर केला.
डॉ. सुनील घाटे, डॉ. एस. एस. सरवदे, डॉ. निलोफर बोहरी आणि डॉ. सचिन बंदीछोडे अशी या डॉक्टरांची नावे आहेत. 16 ऑगस्ट रोजी डॉ. किरण जाधव यांनी शासकीय रुग्णालयातील ‘बी’ ब्लॉकमध्ये असलेल्या डॉक्टर रूममध्ये विषारी इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर मयत किरण जाधव यांचा भाऊ उमेशने सदर बझार पोलिसांत फिर्याद दिली होती. त्यानुसार चौघा डॉक्टरांवर गुन्हा दाखल झाला होता.
डॉक्टरांचे आंदोलन
किरण जाधव यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या कुटुंबीयांस आर्थिक मदत मिळावी यासह अन्य मागण्यांसाठी निवासी डॉक्टरांच्या मार्ड (महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेन्ट डॉक्टर्स) या संघटनेने शुक्रवारी पुकारलेल्या सामूहिक रजा आंदोलनात 13क् निवासी डॉक्टर सहभागी झाले होते.