विनयभंग प्रकरणात नेसभोवती फास आवळला?
By Admin | Updated: June 21, 2014 01:48 IST2014-06-21T01:48:57+5:302014-06-21T01:48:57+5:30
नेस वाडीया विरोधा दाखल झालेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यात मरिनड्राईव्ह पोलिसांनी अजूनर्पयत एकूण सातजणांचे जबाब नोंदविले आहेत.

विनयभंग प्रकरणात नेसभोवती फास आवळला?
>मुंबई : नेस वाडीया विरोधा दाखल झालेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यात मरिनड्राईव्ह पोलिसांनी अजूनर्पयत एकूण सातजणांचे जबाब नोंदविले आहेत. त्यापैकी पहिले दोन साक्षीदार हे प्रीती ङिांटा आणि नेस वाडीया यांचे कॉमन फ्रेन्डस आहेत. त्यांची नावे दानीष र्मचट आणि जय कनोजीया अशी असल्याचे समजते.
बीसीसीआयकडून हे दोघे 3क् मे रोजी वानखेडे स्टेडीयम, गरवारे स्टॅण्डमध्ये हजर होते अशी माहिती मिळाल्यानंतर मरिनड्राईव्ह पोलिसांनी त्यांचे जबाब नोंदविले. हे दोघे नेस-प्रीती यांच्यात झालेला वाद आणि त्यानंतर नेस यांनी प्रीतीला दिलेली गैरवागणुकीचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असल्याचे समजते.
या दोघांनी आपल्या जबाबात घडलेला सर्व प्रकार नमूद केला आहे. त्यामुळे प्रीतीच्या तक्रारीवरून पोलिसांनी नेस यांच्याविरोधात दाखल केलेला गुन्हा आणखी भक्कम झाला आहे.
एका वरिष्ठ अधिकारयाने लोकमतला दिलेल्या माहितीनुसार जर वानखेडे स्टेडीयमच्या सीसीटीव्ही चित्रणात सापडला नाही तरी साक्षीदारांचे जबाब नेस यांच्याविरोधातील कारवाईसाठी पुरेसे आहेत. (प्रतिनिधी)