शाळेच्या विश्वस्तासह शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल

By Admin | Updated: June 6, 2017 02:16 IST2017-06-06T02:16:46+5:302017-06-06T02:16:46+5:30

साडेतीन वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी शाळेच्या विश्वस्तासह शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल केला आहे

A case has been registered against the teacher along with the trustee of the school | शाळेच्या विश्वस्तासह शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल

शाळेच्या विश्वस्तासह शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अंधेरीतील एका नामांकित शाळेमध्ये शिकत असलेल्या साडेतीन वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी शाळेच्या विश्वस्तासह शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. शाळेचा विश्वस्त हा जर्मन नागरिक असून, अटकेच्या भीतीने विश्वस्त परदेशात पळून गेल्याची माहीती समोर येत आहे.
अंधेरी पूर्वेकडील परिसरात ही शाळा आहे. या शाळेत अनेक नामांकित मंडळीची मुले शिक्षण घेत आहेत. याच शाळेतील नर्सरीमध्ये पिडीत साडेतीन वर्षीय मुलगी शिकते. काही दिवसापूर्वी तिच्या वागण्यात बदल झाल्याचे तिच्या आईच्या लक्षात आले. तिने मुलीकडे विचारपूस केली असता हा धक्कादायक प्रकार समोर आला. शाळेतील एका शिक्षिकेने आपल्याला आणि आणखी एका मुलीला शाळेच्या विश्वस्तांच्या खोलीमध्ये नेले. तेथे
विश्वस्ताने आपल्यासोबत अश्लील वर्तणूक केल्याचे मुलीने आईला सांगितले.
दरम्यान, मुलीसोबत घडलेल्या प्रकारामुळे तिच्या कुटुंबियाना धक्का बसला. आईने एमआयडीसी पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली आहे. मुलीच्या आईच्या तक्रारीवरून आरोपी विश्वस्तासह एका शिक्षिकेविरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: A case has been registered against the teacher along with the trustee of the school