शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

Mohit Kamboj : भाजप नेते मोहित कंबोज यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल, कर्ज बुडवल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2022 09:12 IST

Mohit Kamboj Bharatiya : कर्ज बुडवल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून मंगळवारी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई : भाजपचे नेते मोहित कंबोज भारतीय (Mohit Kamboj Bhartiya) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्ज बुडवल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून मंगळवारी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, मोहित कंबोज यांच्यासह त्यांच्या कंपनीतील दोन संचालकांविरोधात सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मोहित कंबोज यांच्या कंपनीने 2011 ते 2015 या कालावधीत इंडियन ओव्हरसिज बँकेकडून 52 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. या बँकेची फसवणूक करत कर्ज बुडवल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. बँकेकडून कर्ज घेतले पण कर्जाची ही रक्कम ज्यासाठी घेतली होती त्या कामासाठी न वापरता इतरत्र वापरल्याचा मोहित कंबोज यांच्यावर आरोप आहे. 

दरम्यान, मोहित कंबोज यांनी स्वतः ट्विट करून आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. मोहित कंबोज यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, "आज माझ्या विरुद्ध ईओडब्ल्यू मुंबईत पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी एक बनावट एफआयआर नोंदवला आहे. माझ्या विरुद्ध एफआयआर करुन जर वाटत असेल की मी घाबरून जाईल तर तसे नाही आहे. मी तथ्यांसह न्यायालयात जाईन."

याचबरोबर, मोहित कंबोज यांनी आणखी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये एक व्हिडीओद्वारे मोहित कंबोज म्हणाले की, "मला कळालं की, मुंबई पोलिसांनी माझ्याविरोधात एफआयआर दाखल केली आहे. एक जुनी कंपनी जी 2017 मध्ये बंद झाली आहे. त्याचे बॅंक इश्यू काढून माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे. मला असे वाटते की, महाविकास आघाडी सरकार असं करुन माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असेल किंवा मला धमकावण्याचा प्रयत्न करत असेल तर तसं अजिबात होणार नाही. हा नवाब मलिकांचा बदला असेल किंवा संजय राऊतांचा, मी याविरोधात कोर्टात कायदेशीर लढा देईन. आम्ही याला घाबरणार नाही" असे म्हणत म्हणत मोहित कंबोज यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत.

टॅग्स :BJPभाजपाMumbaiमुंबईCrime Newsगुन्हेगारीEconomic Offence Wingआर्थिक गुन्हे शाखा