युती झाल्यास सुंठीवाचून खोकला जाईल - शरद पवार

By Admin | Updated: November 25, 2014 12:43 IST2014-11-25T11:09:08+5:302014-11-25T12:43:32+5:30

सेनेने भाजपाला पाठिंबा दिला आणि युती झाली तर सुंठीवाचून खोकला जाईल असे वक्तव्य शरद पवार यांनी केले.

In case of coalition, it will be coughing without mentioning - Sharad Pawar | युती झाल्यास सुंठीवाचून खोकला जाईल - शरद पवार

युती झाल्यास सुंठीवाचून खोकला जाईल - शरद पवार

 ऑनलाइन लोकमत

क-हाड, दि. २५ - एकत्र यायचं की नाही हा शिवसेना- भाजपाचा प्रश्न आहे, मात्र सेनेने भाजपाला पाठिंबा दिला आणि युती झाली तर सुंठीवाचून खोकला जाईल असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. महाराष्ट्रातील सत्ता सहभागाप्रकरणी गेल्या अनके दिवसांपासून सेना-भाजपामध्ये चर्चा सुरू आहे, मात्र अद्यापही त्यांचा निर्णय झालेला नाही. दोन्ही पक्षांच्या या तिढ्याबाबत बोलताना शरद पवारांनी हे मत व्यक्त केले. 

राज्यात पुन्हा निवडणुका घ्यायला लागू नयेत, स्थिर सरकार यावे यासाठीच आम्ही भाजपाला पाठिंबा दिला, याचा पुनरुच्चार त्यांनी केला. राष्ट्रवादीने भाजपाला बाहेरून दिलेल्या बिनशर्त पाठिंब्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. तसेच शिवसेना-भाजपा युतीचा निर्णयही होऊ शकलेला नाही.

Web Title: In case of coalition, it will be coughing without mentioning - Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.