व्यंगचित्राचे पडसाद - शिवसेनेच्या खासदार-आमदारांचा राजीनामा?
By Admin | Updated: September 27, 2016 21:57 IST2016-09-27T21:46:39+5:302016-09-27T21:57:59+5:30
शिवसेनेचे मुखपत्र सामनामध्ये मराठा समाजाच्या मूक मोर्चाबाबत छापून आलेल्या व्यंगचित्राचे पडसाद राज्यातल्या विविध भागात उमटत आहेत. हे पडसाद आता शिवसेनेच्या नेत्यांमध्येही दिसतं आहेत.

व्यंगचित्राचे पडसाद - शिवसेनेच्या खासदार-आमदारांचा राजीनामा?
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २७ - शिवसेनेचे मुखपत्र सामनामध्ये मराठा समाजाच्या मूक मोर्चाबाबत छापून आलेल्या व्यंगचित्राचे पडसाद राज्यातल्या विविध भागात उमटत आहेत. हे पडसाद आता शिवसेनेच्या नेत्यांमध्येही दिसत आहेत. सामना वृत्तपत्रात छापलेल्या व्यंगचित्राच्या निषेधार्थ शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव, आमदार शशिकांत खेडेकर आणि आमदार संजय रायमुलकर यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा दिला असल्याचे वृत्त एबीपी माझाने दिलं आहे.
राज्यभर निघत असणार्या मराठा क्रांती मूक मोर्चावर सोमवारी ‘सामना’तून विडंबनात्मक व्यंगचित्र छापून आलं होतं. त्याचे पडसाद राज्यातून उपटत आहेत. अनेक ठिकाणी सामाना वृत्तमानपत्र जाळून निशेध करण्यात आला आहे.
तर आज दुपारी ठाण्यातील सामनाच्या कार्यालयावर दगडफेक करण्यात आली आहे. आयबीएन लोकमतच्या वृत्तानुसार या हल्ल्याची जबाबदारी संभाजी ब्रिगेडनं स्वीकारली आहे. दोन अज्ञात बाइकस्वारांनी सामनाच्या कार्यालयावर दगडफेक आणि शाई फेकल्याचं वृत्त आहे. नवी मुंबईतील वाशी इथल्या ‘सामना’च्या कार्यालयावरही अज्ञातांनी दगडफेक केली.