कारची दुभाजकास धडक, पाच जखमी
By Admin | Updated: May 16, 2016 20:38 IST2016-05-16T20:38:10+5:302016-05-16T20:38:10+5:30
सोलापूर - पुणे राष्ट्रीय महामार्गावर सोलापूर शहरालगत असलेल्या जुना पुना नाका येथे एका भरधाव कारची दुभाजकास जोराची धडक बसून त्यात पाच जण जखमी झाल्याची घटना सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास घडली़

कारची दुभाजकास धडक, पाच जखमी
>ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. १६ : सोलापूर - पुणे राष्ट्रीय महामार्गावर सोलापूर शहरालगत असलेल्या जुना पुना नाका येथे एका भरधाव कारची दुभाजकास जोराची धडक बसून त्यात पाच जण जखमी झाल्याची घटना सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास घडली़
या अपघातात श्रीनिवास कारभारी, रुपाली कारभारी, सुजाता कारभारी, दक्ष कारभारी, आरोही कारभारी (सर्व.रा.बिदर राज्य, कर्नाटक)अशी जखमींची नावे आहेत. हा अपघात झालेल्या नंतर लोकांनी कारमधील जखमींना कारच्या काचा फोडून बाहेर काढले. या अपघातानंतर पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुक विस्कळीत झाली होती़ अपघातातील जखमींना बाहेर काढण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी मदत केली़ या जखमींना उपचारासाठी शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे़