औरंगाबादमध्ये कार जाळल्या

By Admin | Updated: February 14, 2017 03:41 IST2017-02-14T03:41:34+5:302017-02-14T03:41:34+5:30

औरंगपुरा भागातील स. भु. शिक्षणसंस्थेच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या चार कार अज्ञात समाजकंटकानी रविवारी रात्री जाळल्या,

Cars burned in Aurangabad | औरंगाबादमध्ये कार जाळल्या

औरंगाबादमध्ये कार जाळल्या

औरंगाबाद : औरंगपुरा भागातील स. भु. शिक्षणसंस्थेच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या चार कार अज्ञात समाजकंटकानी रविवारी रात्री जाळल्या, तर एका कारमालकाची दीड महिन्यात ही दुसरी कार जाळण्यात आली. क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला गेला.
रात्री तीनच्या सुमारास अज्ञात समाजकंटकाने संतोष बागला यांची नवी कोरी कार इंधन टाकून पेटविली. दोन कारच्या मध्यभागी असलेल्या त्यांच्या कारच्या ज्वाला शेजारील दोन्ही कारपर्यंत गेल्या आणि त्या जळून खाक झाल्या. मागील एक कारही जळली. अग्निशामक दल, पोलीस आणि परिसरातील रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळविले. त्यामुळे सुमारे ५० कार आगीच्या भक्ष्यस्थानी जाण्यापासून वाचल्या. (प्रतिनिधी)

Web Title: Cars burned in Aurangabad