कर्नाटकी हापूस अन् आंध्रचा बदाम
By Admin | Updated: April 8, 2015 01:45 IST2015-04-08T01:45:27+5:302015-04-08T01:45:27+5:30
कोकणातील हापूस बाजारपेठेत दाखल होण्यापूर्वीच ठाणे शहरातील बाजारपेठेत कर्नाटकी हापूस, लालबाग आणि आंध्र प्रदेशातील बदाम आंबा

कर्नाटकी हापूस अन् आंध्रचा बदाम
ठाणे : कोकणातील हापूस बाजारपेठेत दाखल होण्यापूर्वीच ठाणे शहरातील बाजारपेठेत कर्नाटकी हापूस, लालबाग आणि आंध्र प्रदेशातील बदाम आंबा विक्रीसाठी दाखल झाला आहे. हापूस आंब्याची २३० ते २५० रुपये, बदाम आणि लालबाग आंब्याची १०० ते १५० रु पये प्रति किलोने विक्री होत आहे. दक्षिण भारतातील आंबा आपल्याकडे लवकर दाखल झाल्याने आमरसाच्या पर्वणीला मात्र यानिमित्ताने सुरुवात झाली आहे.
सध्या मागणी जास्त आणि आवक कमी असल्याने आंब्याचे भाव थोडे जास्तच आहेत. तरीही खरेदीला वेग आला आहे. यंदा आंब्याला विक्रमी मोहर लागला होता. त्यामुळे आंब्याचे उत्पादन चांगले येईल, असा अंदाज होता. परंतु अवकाळी पाऊस, गारपीट झाली आणि बरेच दिवस ढगाळ वातावरण होते. यामुळे आंब्यांचा ५० टक्क्यांपेक्षा जास्त मोहर गळून पडल्याने उत्पादनात घट येणार आहे. परंतु असे असले तरी हापूस आंब्याचे भाव मात्र चढेच आहेत. (प्रतिनिधी)