मलवाहिन्यांची देखभाल खासगी कंपनीकडे

By Admin | Updated: June 28, 2016 02:00 IST2016-06-28T02:00:50+5:302016-06-28T02:00:50+5:30

मलवाहिन्यांच्या देखभालीची जबाबदारी असलेल्या मलनि:सारण प्रचलन खात्याकडे अभियांत्रिकी कर्मचारी व अधिकारीच नाहीत़

The care of the debris to the private company | मलवाहिन्यांची देखभाल खासगी कंपनीकडे

मलवाहिन्यांची देखभाल खासगी कंपनीकडे


मुंबई : मुंबईतील मॅनहोल्सला जोडणाऱ्या मलवाहिन्यांच्या देखभालीची जबाबदारी असलेल्या मलनि:सारण प्रचलन खात्याकडे अभियांत्रिकी कर्मचारी व अधिकारीच नाहीत़ त्यामुळे मलवाहिन्यांचे सर्वेक्षण आणि देखभालीचे खासगीकरण करण्याची वेळ महापालिकेवर आली आहे़ या कामासाठी खासगी पुरवठा कंपनीकडून मनुष्यबळ घेण्यात येणार आहे़ यासाठी तब्बल पावणेचार कोटी रुपये ठेकेदाराला मोजण्यात येणार आहेत.
मुंबईत दररोज तयार होणाऱ्या मलजलावरप्रक्रिया करून त्याचे शुद्धीकरण केलेले मलजल समुद्रात किंवा खाडीत सोडण्यात येत असते़ यासाठी मुंबईतील इमारती व वसाहतींमधील शौचालयांची जोडणी ही मलवाहिन्यांशी करण्यात आलेली आहे़ मलनि:सारण प्रचलन खात्यामार्फत अंतर्गत स्थितीचे सर्वेक्षण, मलवाहिन्यांचे चरविरहित पद्धतीने पुनर्वसन व रस्त्यांखालून जाणाऱ्या मलजोडण्यांचे सर्वेक्षण आदी कामे केली जातात़
या वर्षी सुमारे ४० कि़मी. लांबीच्या वाहिन्यांचे चरविरहित पद्धतीने पुनर्वसन करण्यात येणार आहे़ त्याचबरोबर मनुष्यप्रवेश शक्य नसलेल्या मलवाहिन्यांची
स्थिती तपासण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येणार आहे़ मात्र उर्वरित कामांची देखभाल करण्यासाठी या खात्याकडे पुरेसा अभियांत्रिकी वर्ग नाही़ (प्रतिनिधी)
।या कामांची असेल जबाबदारी
शहर व उपनगरातील मलवाहिन्यांच्या अंतर्गत स्थितीचे सर्वेक्षण, मलवाहिन्यांच्या चरविरहित तंत्रज्ञानाने पुनर्वसन, मॅनहोल्समधील मालमत्ता जोडण्याचे सर्वेक्षण तसेच वेळोवेळी हाती येणारी इतर कामे अशी जबाबदारी संबंधित कंपनीवर असणार आहे़
खासगी मनुष्यबळ
१ प्रकल्प व्यवस्थापक, २ प्रकल्प उपव्यवस्थापक, ३० प्रकल्प अभियंते, २ विश्लेषक अभियंते, २ संगणक आॅपरेटर आणि ४ कार्यालय सहायक आदी मनुष्यबळ खासगी कंपनी उपलब्ध करून देणार आहे़ प्रकल्प व्यवस्थापकांचे मासिक वेतन पावणेदोन लाख रुपये असणार आहे़

Web Title: The care of the debris to the private company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.