पश्चिम द्रुतगती मार्गावर अंधेरीजवळ कारने घेतला पेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 12:59 IST2017-07-19T12:29:28+5:302017-07-19T12:59:34+5:30

पश्चिम द्रुतगती मार्गावर अंधेरी उड्डाणपूलावर आज सकाळी कारला आग लागली. या घटनेमुळे पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतुकीचा काही काळ खोळंबा झाला

The car was taken by Andheri on Western Express Highway | पश्चिम द्रुतगती मार्गावर अंधेरीजवळ कारने घेतला पेट

पश्चिम द्रुतगती मार्गावर अंधेरीजवळ कारने घेतला पेट

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 19 -  पश्चिम द्रुतगती मार्गावर अंधेरी उड्डाणपूलावर आज साडे अकरा ते 12 च्या सुमारास कारला आग लागली. ही आग झपाट्याने भडकल्याने त्यात संपूर्ण कार जळून खाक झाली. सुदैवाने कार मधील प्रवाशी बचावले. मात्र या घटनेमुळे पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतुकीचा काही काळ खोळंबा झाला. अखेर अग्निशमन दलाने घटनास्थळी येऊन आगीवर नियंत्रण मिळवल्यावर मार्गावरील वाहतून संथगतीने सुरू झाली. 
अचानक लागलेल्या या आगीमुळे पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतुकीला काही काळ ब्रेक लागला होता. त्यामुळे जोगेश्वरीकडे जाणाऱ्या वाहनांचा खोळंबा होऊन वाहतून कोंडी झाली. तसेच ज्या ठिकाणी ही आग लागली त्याच्यावरून मेट्रो रेल्वेचा पूल जात असल्याने मेट्रोच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला. मात्र   या आगीची झळ मेट्रोला बसली नसल्याचे मेट्रो प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. 

Web Title: The car was taken by Andheri on Western Express Highway