भरधाव कारने मुख्याध्यापकास चिरडले
By Admin | Updated: July 11, 2016 22:24 IST2016-07-11T22:24:58+5:302016-07-11T22:24:58+5:30
कार्यालयीन काम आटोपुन गावाकडे निघालेल्या मुख्याध्यापकास भरधाव कारने चिरडल्याची घटना सोमवारी रात्री आठच्या सुमारास विरेगावजवळ घडली. कार चालक फरार असून मयत

भरधाव कारने मुख्याध्यापकास चिरडले
चालक फरार : मयत मुख्याध्यापक भंडारा जिल्ह्यातील
जालना : कार्यालयीन काम आटोपुन गावाकडे निघालेल्या मुख्याध्यापकास भरधाव कारने चिरडल्याची घटना सोमवारी रात्री आठच्या सुमारास विरेगावजवळ घडली. कार चालक फरार असून मयत मुख्याध्यापक हे भंडारा जिल्ह्यातील रहिवाशी आहेत.
नासीक सुखदेवे (३०, चरटी, ता.साकोली, जि.भंडारा) असे मृत मुख्याध्यापकाचे नाव असून ते नागोबाचीवाडी (ता.घनसावंगी) येथील जिल्हा परिषद शाळेवर मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. सोमवारी ते जालन्याहून वाटूरफाटा येथे दुचाकीवरून (एमएच.३६, टी.५९३९) निघाले होते. विरेगावजवळील एका पंपावर दुचाकीत पेट्रोल भरल्यानंतर जालन्याहून मंठ्याकडे जाणाऱ्या भरधाव कारने (एमएच २२, यू. ४१३५) आगोदर रिक्षाला (एमएच ०९, टी. ९५६) धडक दिली. त्यानंतर सुखदेवे यांच्या दुचाकीला धडक देली. यामध्ये तब्बल १०० फुटापर्यंत दुचाकी फरफटत गेल्याने ते जागीच ठार झाले. त्यानंतर कार चालकासह रिक्षा चालकही फरार झाला.
दरम्यान, शिवसेना जिल्हाप्रमुख आसाराम बोराडे हे मंठ्याकडे जात असताना त्यांना हा प्रकार दिसताच त्यांनी रूग्णवाहिका व पोलिसांना माहिती दिली. यावेळी पाऊसही सुरू होता. शवविच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा रूग्णालयात आणण्यात आला होता. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.