भोरजवळ कार नदीत कोसळून ५ ठार
By Admin | Updated: March 11, 2015 12:20 IST2015-03-11T12:20:31+5:302015-03-11T12:20:42+5:30
महाड - भोर मार्गावरील पुण्याच्या दिशेन येणारी कार नीरा नदीत कोसळून झालेल्या अपघातात पाच जण ठार झाले आहेत.

भोरजवळ कार नदीत कोसळून ५ ठार
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. ११ - महाड - भोर मार्गावरील पुण्याच्या दिशेन येणारी कार नीरा नदीत कोसळून झालेल्या अपघातात पाच जण ठार झाले आहेत. मंगळवारी रात्री हा अपघात झाला असून या दुर्घटनेत दोन पुरूष, दोन महिला व एका लहान मुलाचा समावेश आहे.
अपघातातील सर्व मृत नागरिक हे चिंचवडचे रहिवासी असून ते एकाच कुटुंबातील आहेत. ते महाडहून पुण्याला जात असताना हा अपघात झाला. ऑल्टो कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार पुलाचा कठडा तोडून नदीच्या पात्रात कोसळली आणि पाच जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
नाशिक-पुणे महामार्गावरही अपघाता, ३ ठार
दरम्यान नाशिक-पुणे महामार्गावरही आज एक अपघात झाला असून त्यात तिघांना प्राण गमवावे लागले. सायखिंडी फाट्यावर दोन वाहनांची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात तीन जण ठार झाले. या अपघातामुळे वाहतुकीची कोंडी झाल्याने महामार्ग काही काळ ठप्प झाला होता.