कारची धडक, दोन जागीच ठार
By Admin | Updated: September 19, 2016 03:11 IST2016-09-19T03:11:45+5:302016-09-19T03:11:45+5:30
कारने दिलेल्या धडकेमुळे खारेकुरण येथील विकास चौधरी (वय २८ वर्ष) आणि योगेश नाईक (वय ४० वर्ष) या दोघा मोटारसायकलस्वारांचा जागीच मृत्यू

कारची धडक, दोन जागीच ठार
पालघर : बोईसर येथे नरेंद्र महाराज संप्रदायाने आयोजिलेल्या रक्तदान शिबिरातून मनोरकडे येत असतांना कारने दिलेल्या धडकेमुळे खारेकुरण येथील विकास चौधरी (वय २८ वर्ष) आणि योगेश नाईक (वय ४० वर्ष) या दोघा मोटारसायकलस्वारांचा जागीच मृत्यू झाला आहे.
हे दोघे बोईसर चिल्हार फाटा मार्गे मनोर कडे जात असतांना मस्तान नाक्या जवळील नांदगावच्या सिमला हॉटेल जवळ वळण घेतांना मागून येणाऱ्या स्कोडाने मोटारसायकलला जोरदार धडक दिली. त्यामुळे हे दोघे ही दूर फेकले गेले. त्यांच्या डोक्याला जोरदार मार लागून त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.
मनोर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. हा परिसर सतत होणाऱ्या अपघातांमुळे डेंजर झोन ठरला आहे. (वार्ताहर)