ताडोबा सफारीवर जाताना कार उलटली
By Admin | Updated: June 5, 2017 15:55 IST2017-06-05T15:16:54+5:302017-06-05T15:55:45+5:30
भिसी ते चिमूर मार्गावर भिसीपासून आठ कि.मी.अंतरावर खापरी धर्मू गावाजवळील नागमोडी वळणावर सोमवारी दुपारी 1 वाजताच्या सुमारास चालकाचे नियंत्रण सुटल्याने

ताडोबा सफारीवर जाताना कार उलटली
ऑनलाइन लोकमत
चंद्रपूर, दि. 5 - भिसी ते चिमूर मार्गावर भिसीपासून आठ कि.मी.अंतरावर खापरी धर्मू गावाजवळील नागमोडी वळणावर सोमवारी दुपारी 1 वाजताच्या सुमारास चालकाचे नियंत्रण सुटल्याने आयटेन एमएच 31_डी के -4454 चारचाकी वाहन रस्त्याच्या खाली जावून पलटले. या वाहनात धरमपेठ नागपूर येथील करंडे हे कुटुंब होतं. सुदैवाने कुणीही गंभीर जखमी झाले नाही. या वाहनाव्यतिरिक्त आणखी दोन वाहन होती.हे सर्व ताडोबा सफरीवर जात होते.
गाडी पलटूनही कुणाला फारसा मार न लागल्याने "काळआला होता पण वेळ आली नव्हती."या म्हणीचा प्रत्यय इथे आला.
आतापर्यंत या नागमोडी वळणावर अनेकदा अपघात घडले आहेत.