सनीचे मारेकरी कॅमेऱ्यात कैद

By Admin | Updated: July 7, 2015 02:05 IST2015-07-07T02:05:36+5:302015-07-07T02:05:36+5:30

दलित तरुण सनी शिंदे याचे मारेकरी हे अटक करण्यात आलेले चार जणच असल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट झाले आहे.

Capture in Sunny Assassin Camera | सनीचे मारेकरी कॅमेऱ्यात कैद

सनीचे मारेकरी कॅमेऱ्यात कैद


अहमदनगर : दलित तरुण सनी शिंदे याचे मारेकरी हे अटक करण्यात आलेले चार जणच असल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट झाले आहे. चौघांनी जबर मारहाण केल्याने सनीचा मृत्यू झाल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
अत्याचाराच्या गुन्ह्यातील अल्पवयीन आरोपी सनी शरद शिंदे हा ३० मे रोजी नगरच्या बालसुधारगृहातून पळून गेला होता. त्याचा मृतदेह बीड जिल्ह्यात आढळला होता.
शुक्रवारी चौघेजण कोतवाली पोलीस ठाण्यात स्वत:हून हजर झाले आणि त्यांनी सनी शिंदे याच्या खुनाची कबुली दिली आहे. त्यांनी नगर परिसरातून सनीचे अपहरण केले. पाटोदा तालुक्यातील एका पेट्रोलपंपावर गाडी थांबले होते. तेथे सर्व जण खाली उतरले होते. त्यानंतर चौघांनी सनीला गाडीत घातले आणि ते निघून गेले, असे चित्रण पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. त्यामुळे त्या चौघांनीच सनीला मारले, याचा सबळ पुरावा पोलिसांच्या हाती लागला आहे.

Web Title: Capture in Sunny Assassin Camera