लाचखोर विक्रीकर आयुक्त अटकेत
By Admin | Updated: February 28, 2015 06:22 IST2015-02-28T05:13:53+5:302015-02-28T06:22:22+5:30
दहिसरमधील एका मिठाई विक्रेत्याकडून चार लाखांची लाच स्वीकारताना विक्रीकर विभागाच्या सहाय्यक आयुक्ताला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने

लाचखोर विक्रीकर आयुक्त अटकेत
मुंबई : दहिसरमधील एका मिठाई विक्रेत्याकडून चार लाखांची लाच स्वीकारताना विक्रीकर विभागाच्या सहाय्यक आयुक्ताला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुरूवारी रंगेहाथ अटक केली. किरण काकड (४५) असे त्याचे नाव असून एसीबीने त्याच्या कार्यालय व निवासस्थानी धाडी घातल्या.
मिठाई विक्रेत्याविरोधात विक्रीकर थकवल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई न करण्यासाठी काकडने तब्बल १० लाखांची लाच मागितली. पुढे त्याने मागणी ४ लाखांपर्यंत खाली उतरवली. काकडला अटक केल्यानंतर दादर येथील त्याच्या निवासस्थानी एसीबीने छापे घातले. त्यात सुमारे १५ लाखांची रोकड सापडली. (प्रतिनिधी)