शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
4
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
5
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
6
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
7
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
8
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
9
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
10
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
11
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
12
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
13
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
14
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
15
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
16
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
17
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
18
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
19
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
20
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...

आर्थिक मंदीतही यंदा मकरसंक्रांत होणार गोड; रेडिमेड तीळगुळाला महिलांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2020 00:02 IST

साहित्याच्या किमतीत घट, तिळाच्या लाडवांचा खर्च तुलनेने कमी

सुनिल घरतपारोळ : वाढत्या महागाईबरोबरच आर्थिक मंदीची झळ बसलेली असताना यंदाची मकरसंक्रांत मात्र गोड ठरणार आहे. किरकोळ बाजारात तिळाच्या किमतीत गेल्या वर्षीच्या तुलनेत ४० रुपयांनी घट झाली असून खोबरे, शेंगदाणे आणि गुळाच्या किमतीही कमी झाल्या आहेत. त्यामुळे यंदा तिळाच्या लाडवांचा खर्च तुलनेने कमी असेल. त्यातही वसईतील बहुतांश गृहिणींनी रेडीमेड तिळगुळांना मोठ्या प्रमाणात मागणी केल्याचे दिसून येते.

यंदाच्या वर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे कृषी मालाचे दर काही महिन्यांपासून चढेच आहेत. भाज्यांसह सारेच महागल्याने यंदा तिळाचे लाडू बनविण्यासाठी लागणारे जिन्नसही तसेच महाग असतील, अशी शक्यता व्यापारी सुरुवातीला व्यक्त करत होते. देशांतर्गत तिळाचे उत्पादन कमी झाले असले तरी, परदेशातून पुरेशा प्रमाणात आवक झाली आहे. त्यामुळे गेल्या तीन - चार महिन्यांच्या तुलनेत तिळाचे दर वाढले आहेत. मात्र, हे दर गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहेत. गेल्या वर्षी किरकोळ बाजारात २२० रुपये किलोने मिळणाऱ्या तिळाच्या किमतीत या वर्षी ४० रुपयांची घसरण झाली असून तीळ १८० रुपये किलोने किरकोळ बाजारात विकला जात आहे. तिळाखेरीज तिळगुळातील अन्य जिन्नसही गतवर्षीच्या तुलनेत स्वस्त झाले आहेत. गेल्या वर्षी किरकोळ बाजारात २४० रुपये किलोने विकल्या जाणाºया खोबºयाच्या किमतीत ६० रुपयांनी घसरण झाली आहे. सध्या किरकोळ बाजारात १८० रुपये किलो या दराने खोबरे विकले जात आहे. किरकोळ बाजारात गेल्या वर्षी १३० रुपये किलोने विकले जाणारे शेंगदाणे सध्या १२० रुपये किलोने विकले जात आहेत.बंदी असतानाही पतंगाचा मांजा चिनीच?मकरसंक्रांतीचा सण म्हटला म्हणजे डोळ्यांसमोर येतो तो पतंगोत्सव. या पतंगोत्सवाला रंगत चढते ती पतंग काटाकाटीची. यासाठी खास चिनी मांजा वापरला जातो. हा मांजा लवकर तुटत नाही. मात्र, या मांज्यामुळे पक्ष्यांच्या जीवावर बेतल्याच्या अनेक घटना काही वर्षांपासून घडत आहेत. अनेक अपघातही झाले आहेत.चिनी मांजा वापरावर कायद्याने बंदी असतानाही पतंगासाठी सर्रास चिनी मांजाच वापरला जात असल्याचे दिसून येते. सध्या वसईत दुकाने, बाजारपेठांत विविध रंगाचे लहान-मोठ्या आकाराचे पतंग विक्रीसाठी आले आहेत. ते खरेदी करण्यासाठी बच्चे कंपनी गर्दी करू लागले आहेत.

टॅग्स :Makar Sankrantiमकर संक्रांती