समृद्धी महामार्ग असणार कॅशलेस
By Admin | Updated: December 31, 2016 03:06 IST2016-12-31T03:06:08+5:302016-12-31T03:06:08+5:30
नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्स्प्रेस-वे हा ‘समृद्धी महामार्ग’ एका वेगळ्या अर्थाने ‘कॅशलेस’ असेल. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्यावरील टोल वसुली केली जाईल.

समृद्धी महामार्ग असणार कॅशलेस
मुंबई : नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्स्प्रेस-वे हा ‘समृद्धी महामार्ग’ एका वेगळ्या अर्थाने ‘कॅशलेस’ असेल. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्यावरील टोल वसुली केली जाईल. त्यामुळे या महामार्गामध्ये टोलनाके नसतील. त्यासाठी आरएफआयडी तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. टॅग सेन्सर तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल टोल भरण्याची व्यवस्था केली जाणार आहे. या संपूर्ण महामार्गाच्या सुरुवातीला आणि शेवटी टोलनाके असतील. दोन्ही बाजूंनी वा मध्ये कुठेही या महामार्गाचा वापर करणाऱ्या वाहनांचा नंबर संगणकीकृत पद्धतीने टोल नाक्यांवर पोहोचेल आणि वाहनाने कापलेल्या अंतराच्या हिशेबाने टोलची ई-आकारणी केली जाईल. सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंह यांनी ही माहिती दिली. (विशेष प्रतिनिधी)
भूसंपादनाचा नवा फॉर्म्युला अद्याप नाही
समृद्धी महामार्गासाठी भूसंपादनाच्या आधी निश्चित केलेल्या पॅकेजमध्ये काही सुधारणा करण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या महिन्यात त्याबाबतचा फॉर्म्युला ठरविण्यात आला होता. मात्र, त्याचा शासकीय आदेश अद्याप निघालेला नाही.