शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ज्योतिषीय विसंगतीची सबब देत विवाहाचे वचन तोडू शकत नाही - उच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2021 11:21 IST

पीडितेच्या तक्रारीनुसार, बोरिवली पोलिसांनी अविशेक मित्रा याच्यावर बलात्कार व फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यातून दोषमुक्त करावे, यासाठी मित्रा याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

मुंबई : कुंडलीतील ज्योतिषीय विसंगतीचा बहाणा देऊन विवाहाचे वचन मागे घेतले जाऊ शकत नाही, असे स्पष्ट करत उच्च न्यायालयाने एका व्यक्तीची बलात्कार व फसवणुकीच्या आरोपातून मुक्तता करण्यास नकार दिला. पीडितेच्या तक्रारीनुसार, बोरिवली पोलिसांनी अविशेक मित्रा याच्यावर बलात्कार व फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यातून दोषमुक्त करावे, यासाठी मित्रा याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मित्रा याचे वकील राजा ठाकरे यांनी न्यायालयात सांगितले की, जोतिषीय विसंगतीमुळे आरोपी व तक्रारदारमधील नाते पुढे जाऊ शकले नाही. लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार व फसवणूक केल्याचे हे प्रकरण नाही. ठाकरे यांचा हा युक्तिवाद न्या. संदीप शिंदे यांच्या एकलपीठाने अमान्य केला. सुरुवातीपासूनच आरोपीला पीडितेशी विवाह करायचा नव्हता, हे सुचविणारे अनेक पुरावे आहेत. जोतिषीय विसंगतीच्या सबबीखाली आरोपी महिलेशी विवाह करण्यास टाळत आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.प्रथमदर्शनी, महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार केल्याने कारवाई टाळण्यासाठी आरोपीने विवाह करण्याचे आश्वासन दिले, असे न्यायालयाने म्हटले. महिलेने केलेल्या तक्रारीनुसार, २०१२ पासून आरोपी आणि तिची एकमेकांशी ओळख आहे. ते फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये एकत्र काम करत होते. विवाहाचे खोटे आश्वासन देऊन आरोपीने अनेक वेळा तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. त्यामुळे ती गरोदरही झाली. याबाबत तिने आरोपीला माहिती दिली. मात्र, अजूनही आपण लहान आहोत आणि आपल्याला लग्न करायचे नाही, असे सांगत त्याने तिला गर्भपात करायला लावला. त्यानंतर डिसेंबर २०१२ पासून आरोपी महिलेला टाळत होता. तिने घडलेल्या प्रकाराबाबत पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. 

युक्तिवाद अमान्यजानेवारी २०१३ मध्ये आरोपीने तिच्याशी विवाह करण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे महिलेने पोलीस तक्रारही मागे घेतली. तक्रार मागे घेतल्यावर आरोपीने जोतिषीय विसंगतीचे कारण देत विवाहास नकार दिला. त्यामुळे महिलेने पुन्हा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले. न्यायालयाने मित्रा याचा युक्तिवाद अमान्य करत केला. 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयmarriageलग्न